राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत द्विंकल स्टार स्कूलचे घवघवीत यश
शिरोली : ११ व्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा केर्ली (ता-करवीर) येथे पार पडल्या. या स्पर्धेत पुलाची शिरोलीतील द्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कुलच्या १४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. या स्पर्धा विविध गटात पार पडल्या.
यामध्ये कमिते या प्रकारात साहिल ओक, विराज पाटील, शेहजाद शेख, अर्सलान सनदे, विरश्री पाटील यांनी प्रथम क्रमांक, तर त्रिशा
माचक, ओमकार चौगुले, राजलक्ष्मी ढेंबरे, अनिस सनदे यांनी द्वितीय, सृष्टी पाटील, आर्यन बडोदे, राजवीर शिंदे, अनुष्का अवडन, अरव माने यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
यापैकी नऊ विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे. या विद्यार्थ्यांना स्कूलचे चेअरमन, संतोष बाट, मुख्याध्यापिका मनिषा बाटे, कराटे प्रशिक्षिका, दिक्षा लोहार, उपमुख्याध्यापिका, प्रतिक्षा पाटील सर्व शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले.
