‘स्मॅक प्रीमियर लीग’च्या ट्रॉफीचे शानदार अनावरण ; उद्यापासून रंगणार स्पर्धा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग आणि उद्योजकांचा विकास व्हावा. मोठे उद्योग यावे यासाठी राज्य शासन लागेल ती मदत करीत आहे असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. उद्योग आणि खेळ यातून जिल्ह्यातील तरुणांचा सर्वांगीण विकास होईल असेही त्यांनी सांगितले. ते स्मॅक प्रीमियर लीग – २०२४ टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट टुर्नामेंटच्या ट्रॉफी अनावरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मॅकचे चेअरमन सुरेंद्र जैन होते.
स्मॅक प्रीमियर लीग – २०२४ टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट शुक्रवार ०९/०२/२०२४ ते रविवार ११/०२/२०२४ शास्त्रीनगर क्रिकेट मैदान, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे .
स्मॅक द्वारा स्मॅक प्रीमियर लीग या टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन जाते. यामध्ये स्मॅकचे सदस्य , कारखानदार, कर्मचारी व कामगार यांचा सहभाग असतो. कारखानदार व कामगारांना नेहमीच्या दैनंदिन कामातून विश्रांती देणे, कामगारांमध्ये तणावमुक्त वातावरण निर्माण करून त्यांच्यात सांघिक भावना निर्माण करणे, ज्या द्वारे ते एकमेकांशी जोडले जातात आणि त्यांच्या मध्ये एक संधता निर्माण होते, हा या आयोजना मागील मुख्य उद्देश आहे.
स्मॅक प्रीमियर लीग २०२४ चे शुक्रवार दिनांक ०९/०२ / २०२४ ते रविवार दिनांक ११/०२/२०२४ या कालावधी मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रीनगर क्रिकेट मैदानावर आयोजन करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजले पासून रात्री पर्यंत सामने सुरू असतील. सायंकाळचे सामने प्रकाशझोतात असतील.
सदर स्पर्धेचे खालील उद्योगांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे यामध्ये, प्लॅटिनम प्रायोजक – मयुरा ग्रुप, गोल्ड प्रायोजक – इलेक्ट्रॉनिक फायनान्स, सिल्व्हर प्रायोजक विजय इक्विपमेंटस् प्रा. लि., फुड प्रायोजक – यश मेटॅलिकस् प्रा. लिमिटेड, व्ही. पी. ग्रुप, सरोज ग्रुप.
या स्पर्धेसाठी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅकचे चेअरमन श्री. सुरेन्द्र जैन, पदाधिकारी, संचालक, उद्योजकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेचे आयोजन स्मॅकचे सदस्य तरुण उद्योजक अभिषेक सोनी, अभिषेक झंवर, साहिल मोमीन, ओंकार भगत, श्रीराम सुरवसे, कुणाल कट्टी, प्रेम शिंदे आदींनी केले आहे. यामध्ये १] पिनॅकल प्रिसिजन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, २) मिस्टेर हेल्थ ऍण्ड हायजिन लि., ३] कॅस्प्रो ग्रुप, ४] सुयश ग्रुप, ५] कोहिनूर मेटॅलिकस्, ६] एस. एस. टूल्स, ७] बालाजी इंडस्ट्रीज, ८] विजय फौंड्री इक्विपमेंटस्, 9) यश मेटॅलिकस्. १०] गणेश टेक्नॉलॉजी, ११] झंवर ग्रुप, १२] मयुरा स्टील, १३) हिंद गिअर इंडस्ट्रीज, १४] आर्म मशीन टूल्स, १५] सरोज ग्रुप ऑफ कंपनीज् व १६] एस. बी. रिशेलर्स. या कंपनीच्या संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धेतील सामने ७ षटकांचे असतील, एकूण अंतिम सामन्यासह ३१ सामने खेळवले जातील, अंतिम सामना रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वा. खेळवला जाईल. संघामध्ये मालक [ उद्योजक ] खेळणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी अभिषेक सोनी, अभिषेक झंवर आणि त्यांची टीम संयोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहे.
