November 1, 2025

स्मॅक क्रिकेट टूर्नामेंट उत्साहात संपन्न : रत्न उद्योग संघ अजिंक्य

0
GridArt_20250203_201620557

शिरोली : कंपनी मालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नातं हे अति दृढ करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उपयोगी होईल असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आम. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.स्मॅक क्रिकेट टूर्नामेंट विजय संघास बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
स्मॅक चे चेअरमन राजू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अंतिम सामन्यात त्यांनी यश टायगर्स संघाचा पराभव करून रत्न उद्योगच्या संघाने अजिंक्यपद पटकावले आम. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्या संघास चषक देण्यात आले.
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅकच्यावतीने कोल्हापूरातील शास्त्रीनगर मैदानावर स्मॅक क्रिकेट टूर्नामेंट पार पडल्या. स्मॅकचे संचालक, झंवर उद्योग समुहाचे निरज झंवर यांच्या संकल्पनेतून स्मॅकच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये १२ उद्योजक संघाने सहभाग घेतला. स्पर्धेत ७ षटकांचे एकूण अंतिम सामन्यासह १९ सामने खेळवले.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन करवीर दक्षिणचे आ. अमल महाडिक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आ. अमल महाडिक म्हणाले खूप छान खेळा, खेळामध्ये हारजीत होत असते पण जे हरले त्यांनी पुढच्या वेळी जिंकण्यासाठी प्रयत्न करा. पण जो जिंकेल त्याचा सातत्याने जिंकण्याचा प्रयत्न असावा. स्मॅक चे चेअरमन राजू पाटील म्हणाले की प्रत्येक संघाने आपले सामने खेळाडू वृत्तीने खेळावेत. यामुळे नेहमीच्या कामामधून आपल्याला थोडासा विरुंगुळा मिळेल आणि यातून नवीन काहीतरी विकसित करण्यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न करायचे आहेत.
बक्षिस समारंभात बोलताना क्षीरसागर म्हणाले साधारणतः कोल्हापूरचा एक वातावरण वेगळं आहे आपण सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो. आज कोल्हापूर मधील सर्व मालक चांगले आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांना काय त्रास होत नसावा. आज या स्पर्धेमध्ये स्वतः मालक, अधिकारी व कर्मचारी अशा संघानी सहभाग घेतला. ज्यांना विजेतेपद मिळाले आहे त्यांचे मी अभिनंदन करतो.
अंतिम सामन्यात रत्न उद्योग ने आठ षटकात चार बाद त्र्याहतर धावा केला. त्यांच्या अक्षय पाटील ने चवदा चेंडूत वीस धावा व वैभव तासगावकर ने बारा चेंडूत पंधरा धावा केल्या. यश टायगर्स चे कर्णधार अनिल माळी, विनायक स्वामी व संदीप चेचर यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केले.रत्ना उद्योग उत्तर दाखल चार गडी बाद त्र्याहतर धावा करत दोन धावांनी विजय मिळवला.अंतिम सामन्यापूर्वी यश टायगर्स विरुद्ध झंवर ग्रुप चॅम्पियन्स यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात झंवर ग्रुप चॅम्पियन्स चा पाच धावांनी पराभव करत यश टायगर्स ने अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक [ टायटल स्पॉन्सर ] विजय फाउंड्री इक्विपमेंट, सह प्रायोजक [ गोल्ड स्पॉन्सर ] मिस्टेर हेल्थ अँड हायजिन, डग आऊट प्रायोजक डी. आर. एंटरप्राइजेस यांनी स्वीकारले होते. विजय फाउंड्री इक्विपमेंट चे विजय व नवनाथ पोवार तसेच मिस्टेर हेल्थ अँड हायजिन चे विनय ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्मॅक चे ऑ. सेक्रेटरी शेखर कुसाळे आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सदस्य उद्योजक अभिषेक झंवर, साहिल मोमीन, ओंकार भगत, अभिषेक सोनी, श्रीराम सुरवसे, कुणाल कट्टी, प्रेम शिंदे, हर्षवर्धन राठोड यांनी या स्पर्धेचे आयोजन केले.
अंतिम सामन्यासाठी स्मॅकचे ऑ. सेक्रेटरी शेखर कुसाळे, खजानिस बदाम पाटील, संचालक नीरज झंवर, अतुल पाटील, रणजित जाधव, निमंत्रित सदस्य एम. वाय. पाटील, अजिंक्य तळेकर, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष स्वरूप कदम, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष अजय सप्रे, उद्योजक भीमराव खाडे, उदय साळोखे, आदित्य जाधव, सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनचे काका पाटील आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत टायगर्स [ यश मेटॅलिक्स प्रा. लि.], सरोज वॉरियर्स [ सरोज ग्रुप ऑफ कंपनीज् ] , विश्वकर्मा वॉरियर्स [ विश्वकर्मा फौंडर्स (इं) प्रा. लि. ], कॅस्प्रो स्पेअर पार्ट्स [ कॅस्प्रो ग्रुप ऑफ कंपनीज् ] , एस.बी.आर. चॅलेंजर्स [ एस. बी. रिशेलर्स ], रत्ना उद्योग, झंवर ग्रुप चॅम्पियन्स [ झंवर ग्रुप ], सवेरा इलेव्हन [ मयुरा ग्रुप ], ट्रायो चॅलेंजर्स [ ट्रायो एंटरप्राइजेस ], मिस्टेर मार्व्हल्स [ मिस्टेर हेल्थ अँड हायजिन ], कोहिनूर मेटॅलिक्स व व्ही.पी. वॉरियर्स [ व्ही.पी. ग्रुप ].या १२ संघ सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page