उद्योजकांनी खेळाडू, कलाकारांना आर्थिक पाठबळ द्यावे : खा. महाडिक
कोल्हापूर : उद्योजकांनी आपल्या राखीव निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू आणि कलाकारांना आर्थिक पाठबळ देऊन प्रोत्साहित करावे असे प्रतिपादन राज्यसभा खा. धनंजय महाडिक यांनी केले ते
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर [ ‘स्मॅक’ ] द्वारा ‘स्मॅक’ प्रीमियर लीग’ स्पर्धेच्या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस समारंभात बोलत होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे,स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर विभाग चे अधिक्षक शिवराज ब. नाईकवाडे यांची विशेष उपस्थिती होती.
शास्त्रीनगर येथील मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेत
कारखानदार, कर्मचारी व कामगार यांचा समावेश असलेल्या सोळा संघाने सहभाग घेतला. ‘मिस्टेर मार्वेलस’ संघाने १ विकेट गमावून ६३ धावा केल्या व नऊ विकेटने ही स्पर्धा जिंकली.
कोल्हापूरमध्ये चांगले खेळाडू आहेत. त्याप्रमाणात खेळाडूंसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये कोल्हापूरच्या उद्योजकांनी आपला हातभार लावावा प्रशासनाच्यावतीने आवश्यक ते सहकार्य करू असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
यावेळी टायटल प्रायोजक मयुरा ग्रुपचे चंद्रशेखर डोली व रवी डोली, गोल्डन प्रायोजक इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेड चे महाराष्ट्र रिजन प्रमुख सागर चौगुले, सिल्वर प्रायोजक विजय फाउंड्री इक्विपमेंट चे विजय पोवार. फूड स्पॉन्सर्स यश प्रायव्हेट लिमिटेड चे आदित्य जाधव, व्ही. पी. ग्रुप चे विठ्ठल पोळ व सरोज ग्रुप चे दीपक जाधव उपस्थित होते.
यावेळी स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन, व्हाईस चेअरमन जयदीप चौगले, खजानिस बदाम पाटील, ऑ. सेक्रेटरी भरत जाधव, संचालक निरज झंवर, अतुल पाटील, सचिन पाटील, शेखर कुसाळे, सुरेश चौगुले, रणजित जाधव, निमंत्रित सदस्य सचिन मेनन, संजय भगत उपस्थित होते.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन चे अध्यक्ष दिनेश बुधले, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे व उपाध्यक्ष राजू पाटील उपस्थित होते.
सदर स्पर्धेचे आयोजन ‘स्मॅक’ चे सदस्य उद्योजक अभिषेक सोनी, अभिषेक झंवर, साहिल मोमीन, ओकार भगत, श्रीराम सुरवसे, कुणाल कट्टी, प्रेम शिंदे, हर्ष राठोड आदींनी केले.
