हद्दवाढीविरोधात शिरोलीत गावबंद, शोले स्टाईलने आंदोलन
कोल्हापूर – कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत आज मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हदवाढ विरोधी कृती समीतीच्या वतीने गाव बंद आंदोलन पुकारले होते. त्याचाच एक भाग म्हणून शिरोली पुलाची गावाने कडकडीत बंद पाळला एका बाजूला ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रा. पं. सदस्यानी ग्रामस्थासंह मोटरसायकल रॅली काढून हद्दवाढीला तिव्र विरोध दर्शवला. तर एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून पोलीस यंत्रणेची ताराबंळ उडवली.
मुंबईतील बैठकीत पहिल्या टप्प्यातील गावांचा शहरांमध्ये समावेश करण्यासंदर्भातला निर्णय घेतला जावू शकतो. याला प्रस्तावीत २० गावांनी जोरदार विरोध करत आज गावे बंद ठेवली.
शिरोली ग्रामपंचायतीच्यावतीने या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत गाव कडकडीत बंद ठेवले. सरपंच पद्मजा करपे उपसरपंच बाजीराव पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सर्व ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थानी गावात रॅली काढली. ग्रामपंचायत कार्यालाया समोरील छ. शिवरायांच्या पुतळ्याजवळ हद्दवाढ विरोधी घोषणा दिल्या.
यानंतर एका हिंदुत्ववादी संघटनेचे कायकर्ते महामार्गालगत असलेल्या पाण्याच्या टाकीवर हद्दवाढ विरोधी फलक घेऊन चढले. आणि त्यानी शोलेस्टाईल आंदोलन केले. ग्रामपंचयातीच्या वतीने केलेल्या आंदोलनाबाबत पोलीस ठाण्यात सुचना देण्यात आल्या होत्या पण पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या आंदोलनाबाबत पोलीसाना कसलीच कल्पना नव्हती अचानक हे आंदोलन झाल्याने पोलीसांची धांदल उडाली. हे आंदोलन करणाऱ्या योगेश खाडे, निलेश शिंदे, श्रीकांत कदम, विशाल खोचिकर, गणेश खोचिकर, लखन घाडगे, राहुल मोरे, विकी पाटील, आदित्य पाटील, विशाल मोरे, श्रीपाद रंगापुरे, प्रथमेश देसाई, शुभम जाधव या १३ जणांवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
