November 1, 2025

रोटरीचा ‘व्होकेशनल अवॉर्ड’ सामाजिक सकारात्मकता वाढविणारा : संग्राम पाटील

0
IMG_20250622_131739

कोल्हापूर – समाजातील सात्विकता आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी रोटरी क्लब शिरोली एमआयडीसीच्या वतीने समाजातील विविध घटकांना व्होकेशनल अवार्ड पुरस्काराने गौरव करून त्यांच्या कार्याची घेतलेली दखल ही महत्त्वपूर्ण आणि त्यांच्या कार्याला गतिमानता देणारी घटना आहे, अशा शब्दांत माजी गव्हर्नर संग्राम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. क्लबच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
लोकशाही प्रबळ करण्यासाठी विविध संशोधनपर लेखन करणारे प्रा. भालबा विभुते, बालकांच्यामध्ये चित्रपट सजगता वाढवणारी चिल्लर पार्टी, जाणीव फौंडेशनच्या सुषमा बटकडली आणि अंध मुलांसाठी संगीत साधनेतून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या स्वर बहार मंच संस्थांचालकांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्वागत अध्यक्ष सुनील नागावकर यांनी करत हा कौटुंबिक सोहळा आणि यामधील गौरवमूर्ती सर्वांना प्रेरणादायी ठरतील, असा आशावाद व्यक्त केला. वर्षभराच्या कार्याचा आढावा घेत सचिव अनिल पाटील यांनी रोटरी समाजातील विविध घटकांची एकरूप होऊन कार्यरत असल्याचे प्रतीक असल्याचे विविध उपक्रमांतून दिसून येत आहे. आजला गौरव सोहळा हा त्याचेच प्रतिबिंब असलेले सांगत आभार व्यक्त केले. यावेळी वर्षभर सक्रिय सहकार्य करणारे सदस्य तसेच विविध परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने प्रा. भालबा विभुते, जाणीव फौंडेशनच्या सुषमा भटकली यांनीही मनोगत व्यक्त केले. सोहळ्यास माजी अध्यक्ष मोहन मुल्हेरकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page