November 2, 2025

शिये फाटा ते जोतिबा रस्त्यावर शेतकरी संघटनेचे वृक्षारोपण आंदोलन

0
IMG-20240406-WA0252

शिरोली : शिये फाटा ते भुये , तसेच क्षेत्र जोतिबाकडे जाणाऱ्या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात  पडलेल्या खड्ड्यांमुळे  वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर  शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शासकीय यंत्रणेचा निषेध केला.  आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली .

शिये ते भुये क्षेत्र जोतिबाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर वाळू मिश्रित पाणी अखंडपणे येत असल्याने रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पाणी साचून राहिलेने लोकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहने खड्ड्यांत जाऊन अपघात घडत आहेत.
पाटील मळा येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. जोतिबाची यात्रा व शिये यात्रा ही जवळ आलेली असताना हा रस्त्याची दुरुस्ती करून घेणे अत्यंत गरजेचे होते. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरला या रस्त्याची देखभाल दुरुस्ती दिलेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. शनिवारी  या रस्त्यावर दोन ट्रकचे टायर फुटले तर एका छोटा हत्तीची कमान पट्टी तुटली. चार दिवसापूर्वी यावर  तर याप्रश्नी शेतकरी संघटनेचे अँड माणीक शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.दिला होता वाचा प्रकाश टाकला होता. शासनाने तरीही रस्त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यमार्ग क्रमांक 194 शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अडवोकेट माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले. यावेळी बाबासो गोसावी, उत्तम पाटील सर ,भगवान शिंदे, सुरेश पाटील, जयराम पाटील, राजू मगदूम यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page