हालोंडीतील सहस्त्रनाम आराधना महोत्सवात भाविक उत्साहात सहभागी
शिरोली : हालोंडी ता.हातकणंगले येथील श्री 1008 सहस्त्रनाम आराधना महा महोत्सवात भाविक मोठया भक्तीने आणि उत्साहात सहभागी होत आहेत.
पहाटे पाच वाजता मंगल घोषाने आजच्या धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहाटे साडेपाच वाजता यजमानांच्या घरापासून मंडपापर्यंत सर्वाद्य मिरवणूक निघाली.सकाळी सात वाजता सहवाद्य जलकुंभाची मिरवणूक निघाली. आठ वाजता संध्या वंदन,सकलीकरण, भगवंतांचा पंचामृत अभिषेक संपन्न झाला. अन्नदातारांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. भोजन विभागाचे उद्घाटन प्रसिद्ध कापड व्यापारी शंकर शेठ दुल्हानी, तुषार दुल्हानी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सहस्त्रनाम विधानास प्रारंभ झाला. या विधानाला 150 हून अधिक महिला आणि युवक वर्ग बसले आहेत
त्यानंतर आचार्यश्री सुयश गुप्तजी, मुनीश्री तत्त्वार्थ नंदी जी आणि जगद्गुरु जगतपूज्य अभिनव लक्ष्मी भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचे मंगल प्रवचन झाले. सायंकाळी जिनशास्त्र आणि धर्मध्वजाचे हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री सात वाजता तीर्थंकरांच्या मातेवर गर्भसंस्कार विधी संपन्न झाला. त्यानंतर आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सहस्त्रनाम विधानासाठी कोल्हापूर जिल्ह्यासहा सांगली बेळगाव, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक आज दाखल होते.
