हातकणंगलेत दाखले देण्यासाठी अधिकारी सहकार्य करीत नाहीत; मराठा समाजाचे निवेदन
हातकणंगले : महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी नेमलेल्या माजी न्यायमूर्ती मा. संदीप शिंदे समितीने दिलेल्या आदेशाने कुणबी दाखले शोध मोहिम राज्यभर राबविली होती त्या आदेशाने हातकणंगले तालुक्यातील ब-याच कुणबी नोंदी सापडल्या आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी प्रशासनासोबत बैठक घेवून दाखले वितरीत करायच्या सूचना केल्या होत्या. पण तालुक्यामधून येणाऱ्या लोकांना अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळत नसलेचे तसेच वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. तर “कू” म्हणजे कुणबी कशावरून असे सांगितले जात आहे. असे या निवदेनात म्हटले आहे.
तर प्रशासनाकडून प्रत्येक गावोगाव कुणबी दाखले वितरण करणेचे शिबीर लावावे व अधिका-यांना मराठा समाजास सहकार्य करणेस आदेश द्यावे. अन्यथा मंगळवार दि. २० फेब्रुवारी पासून सकाळी ११.०० वा हातकणंगले येथे तहसिलदार कार्यालयासमोर बेमुदत “ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन हातकणंगले सकल मराठा समाजच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांना देण्यात आले.
