स्मॅकच्या वतीने 17 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर
कोल्हापूर : अयोध्या येथे 22 जानेवारीला होणारा श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि सध्याचा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या स्मॅकवतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. हे रक्तदान शिबिर बुधवार दिनांक 17-1-2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत शिरोली एमआयडीसीतील स्मॅक भवन येथे होणार असल्याची माहितीच्या स्मॅकच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आत्तापर्यंत स्मॅकच्या वतीने विविध कारखान्यामधून 750 जणांचे रक्त संकलन झाले असून ‘आपले रक्तदान अनेकांसाठी जीवदान’ हा संदेश देत स्मॅकच्यावतीने आयोजित केलेल्या या रक्तदानासाठी 1000 च्या वर रक्तदात्यांचा टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट आहे. रक्तदात्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता म्हणून हेल्मेट सदिच्छा भेट देण्यात येणार आहे.
शिबिरातून जास्तीत जास्त उद्योजक, कामगार, रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन स्मॅकच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 85 30601616 जितेंद्र आणि 7841914004 प्रमोद यांचेशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.
