गगनबावड्यात ९ जानेवारीपासून शिवशक्ती महायज्ञ
कोल्हापूर :’हे फौंडेशन’च्यावतीने श्री.गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट,गगनबावडा येथे जनकल्याणासाठी शिवशक्ती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ दिवस चालणाऱ्या या यज्ञामध्ये ५१ कुंड शिवशक्ती महायज्ञ ठेवण्यात येणार आहेत. जनकल्याणासाठी हा यज्ञ करण्यात येणार असल्याने भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती,आयोजक डॉ.संगिता पाटील आणि व्यवस्थापक श्री मंगेश लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अशाप्रकारचा यज्ञ आपल्याकडे पहिल्यांदाच होत आहे.या ९ जानेवारी २०२४ ला या यज्ञाची सुरवात धार्मिक विधीने करण्यात येणार आहे.करवीर पीठाचे शंकराचार्य जगदगुरु श्री.श्री.विद्याशंकर भारती यांच्या हस्ते व ज्येष्ठ सिनेअभिनेत्री अल्का कुबल, बिकानेरचे पं.अशोक बिस्सा आणि पं.अशोक रंगा व त्यांचे ८१ सहकारी ब्राह्मण ह्या यावेळी उपस्थित राहणार आहेत. ९ ते १३ जानेवारी या दरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ६ यावेळेत हा यज्ञ सुरू राहणार आहे.
हे फाउंडेशनच्या डॉक्टर संगीता पाटील, व्यवस्थापन मंगेश लाड,बिकानेरचे पंडित अशोक बिस्सा,पंडित अशोक रंगा तसेच धनश्री पब्लिसिटीचे ज्ञानदेव पाटील,अक्षय पाटील आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
