गांधीनगरात गुटखा विक्रेत्यांची कार्यशाळा?- शिवसेनेने केला तीव्र निषेध
कोल्हापूर : गुटखा, मावा, बनावट दारू याचे मुख्य केंद्र बनलेल्या गांधीनगरमध्ये या ८ ते १० दिवसापुर्वी चक्क गुटखा विक्रेत्यांची गुटखा कसा विकवा याबाबत अन्न औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यांने मिटींग घेतली व मार्गदर्शन केल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना समजले. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी ‘अशा अधिकाऱ्याचा सत्कारच करा’ असे उपहासात्मक आवाहन करून आंदोलन करताना सहाय्यक आयुक्त, प्र. प्र. फावडे अन्न व औषध प्रशासन, यांना निवेदना बरोबर एक हारही दिला.
यावेळी बोलताना राजू यादव म्हणाले की, शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री कशी करावी याची कार्यशाळा घेणाऱ्या या पराक्रमी अधिकाऱ्याला हार घालून त्याचा सत्कार करावा. संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करू. यावेळी डी. एम. शिर्के, सहाय्यक आयुक्त हे ही उपस्थित होते.व जिल्हा पोलीस प्रमुखांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली.
आयुक्त, प्र. प्र. फावडे यांनी अशा प्रकारे एखादा जबाबदार अधिकारी शासनाने बंदी घातलेल्या पदार्थाची विक्री कशी करावी याची जर कार्यशाळा घेत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. या अधिकाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी तालुका प्रमुख विनोद खोत,उंचगाव गावप्रमुख दिपक रेडेकर, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, गांधीनगर विभागप्रमुख दिपक पोपटानी, पै. बाबुराव पाटील, अजित चव्हाण, किशोर कामरा आदी उपस्थित होते.
