December 26, 2025

स्वागत कमान कशी उभी राहीली, कशी नामशेष झाली!

0
GridArt_20251107_114228569

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील मुख्य मार्गावर गेली २७ वर्षे उभी असलेली स्वागत कमान अखेर मध्यरात्री महानगर पालीकेच्या यंत्रणेने जमीनदोस्त केली.
कोल्हापूर महानगर पालिकेत जनसंपर्क अधिकारी पदावर असलेल्या अधिकऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन, स्वतःची जाहीरात कंपनी सुरु केली होती. या जाहीरात कंपनीमार्फत महापालिकेशी करार करून सर्व हक्क कंपनीकडे घेऊन ही स्वागत कमान उभी केली होती. त्यानंतर २५ वर्षे ही कमान या कंपनीकडे राहीली. तीन वर्षापूर्वी कोल्हापूर शहराचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी ही स्वागत कमान खाजगी कंपनी किंवा व्यक्ती कडे नसावी. त्यावर जाहीराती ऐवजी राजर्षी शाहू महाराज यांचेच नाव असावे अशी भुमिका घेऊन सदर जाहीरात कंपनीस पर्यायी जागा देऊन या कमानीवरील हक्क सोडण्याबाबत यशस्वी प्रयत्न केले. या कंपनीने कमानीवरील हक्क सोडल्यानंतर कमानीचा ताबा कोल्हापूर महानगर पालिकेकडे आला होता.
चुकीच्या पद्धतीने केलेले दर्जाहीन बांधकाम यामुळे वहातुकीस अडथळा आणि धोकादायक बनलेल्या या स्वागत कमानी बाबत वारंवार होणारी टिका आणि सोशल मिडियावर चर्चा झाल्या. एका व्यक्तीने संपूर्ण जर्जर होऊन धोकादायक बनलेल्या कमानीचा व्हिडीओ करून व्हायरल केला. यामुळे कोल्हापूर शहरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी गांभिर्याने दखल घेऊन महानगरपालीकेच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर येऊन पहाणी केली. ही कमानच काढून टाकून या मार्गावर नवीन स्वागत कमान बांधावी अशा सुचना दिल्या. तसेच नवीन स्वागत कमानी साठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. याबरोबरच त्वरीत कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला यामुळे काल     महापलिकेच्यावतीने ही कमान मध्यरात्री काढून टाकण्याचे नियोजन केले. यासाठी रात्रभर या मार्गावरून शहरात ये जा करणारी वहातूक उचगाव आणि कसबा बावडा मार्गे वळवून त्याबाबत दिवसभर सुचना देण्यात आल्या.
रात्री १० वाजता आवश्यक यंत्रसामुग्री जेसीबी, पोकलँड, टिपर आदी मशीनरी, इंजिनियर, तंत्रज्ञ, कामगार असे मनुष्यबळ यांच्या सहाय्याने कमान पाडण्याचे काम सुरु केले. १२ – ३० वाजे पर्यंत कमान जमीनदोस्त करून पहाटेपर्यंत बांधकामातील सर्व साहित्य बाजूला करून हा मार्ग सकाळी वहातुकीसाठी खुला करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page