तालीम संघाच्या सर्वसाधारण सभेत पदाधीकारी निवड ; व्ही. बी. पाटील अध्यक्ष
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या अध्यक्षपदी व्ही.बी. पाटील, शहराध्यक्षपदी पै. दिनानाथसिंह यांची फेरनिवड करण्यात आली. तालीम संघाची सर्वसाधारण सभा मोतीबाग तालीमीतील जिल्हा तालीम संघ
हॉलमध्ये झाली. या सभेत पदाधिकारी निवडीही एकमताने करण्यात आल्या.
सभेसाठी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रतिनिधी व कुस्तीगीर मोठ्या संख्येने हजर होते. प्रारंभी अॅड. महादेवराव आडगुळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केल्यानंतर ताळेबंद व अहवाल वाचनास एकमताने मंजुरी दिली. २०२३ ते २०२७ साठी जिल्हाध्यक्षपदी व्ही.बी.पाटील, शहराध्यक्षपदी हिंदकेसरी पै. दीनानाथ सिंह व सरचिटणीसपदी अॅड. महादेवराव आडगुळे यांची फेरनिवड करून चीफ पेट्रनपदी कुस्ती मार्गदर्शक बाळ गायकवाड यांची निवड करण्यात आली.
अन्य कार्यकारणी पुढील प्रमाणे. कार्याध्यक्ष – पै. संभाजी वरुटे, वरिष्ठ उपाध्यक्ष – पै. नामदेव मोळे, उपाध्यक्ष – परशराम मेढे, उपाध्यक्ष – पै. अमृत भोसले, उपाध्यक्ष – पै. विनोद चौगुले, उपाध्यक्ष – विष्णू जोशिलकर, उपाध्यक्ष – चंद्रकांत चव्हाण, उपाध्यक्ष – माणिक मंडलिक, खजानिस – निलेश देसाई, कार्यालय चिटणीस – यशवंत मुडळे, चिटणीस- पै. संभाजी पाटील, चिटणीस- राजाराम चौगुले, चिटणीस – बाजीराव पाटील, चिटणीस – अशोक पोवार.
शहर कार्यकारीणी अध्यक्ष – पै. दिनानाथसिंह, कार्याध्यक्ष – पै. अशोक माने, उपाध्यक्ष – बाजीराव कळंत्रे, उपाध्यक्ष – पै. प्रकाश खोत, उपाध्यक्ष – विजय साळुंखे, उपाध्यक्ष – पै. सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष – पै.महेश नलवडे या प्रमाणे निवडी पार पडल्या
