कोल्हापूर : समाजाच्या सर्वांगीण प्रगती व धार्मिक अधिष्ठाना सोबतच, संस्कारक्षम विकासाकरिता धार्मिक उपक्रम ही काळाची गरज असल्याने प्रतिपादन माजी आ. मालोजीराजे छत्रपति यांनी केले. ते श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम,
संचलित श्री अनघादत्तधाम कोल्हापूर या संस्थेचा भूमिपूजन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
ते पुढे म्हणाले आज समाजापुढे असणारी आव्हाने आणि समस्या यामधून समाजाला दिशा मिळण्याची गरज आहे. श्री छत्रपति शाहू महाराजांच्या करवीर नगरी मध्ये आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेच्या आशीर्वादाने असा प्रकल्प उभा राहणे हा कोल्हापूरकरांच्या दृष्टीने खरोखरच भाग्याचा क्षण आहे, असे अशा प्रसंगी समाजातील सर्वांनीच सौहार्दाने एकत्रित राहून उपासना करण्याची आपल्या सर्व कोल्हापूरकरांची परंपरा पूर्वीपासून आहे, त्यामुळे या श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम तर्फे भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा सर्वांना नक्की लाभ होईल
याप्रसंगी बोलताना विश्वपंढरी या धार्मिक संस्थेचे पू. आनंदनाथ महाराज यांनी हा उपक्रम म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभू आणि करवीर निवासिनी श्री अंबामातेच्या आशिर्वादाचे फलस्वरुपाने समस्त कोल्हापूरकरांना मिळालेला उत्तम प्रसाद असून जास्तीत जास्त साधक-उपासकांनी याचा लाभ करून घेऊन आत्मकल्याण साधावे,
याप्रसंगी जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित, विश्वपंढरी संस्थेचे पू. आनंदनाथ महाराज, श्रीविद्या शक्तिपात महायोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुहास जोशी उपस्थित होते,
आभार संस्थेचे सचिव ॲड्. केदार मुनीश्वर यांनी केले.
यावेळी प्रवीण पाटील, ॲड्. सासने, दिगंबर जोशी, बाजीराव जिल्हेदार, अजित पाटील (बेनाडीकर) सिद्धार्थ शिंदे, अभिजित रेणावीकर, ऐश्वर्या मुनीश्वर, सुनील जोशी, राजू मेवेकरी यांसह संस्थेचे सर्व विश्वस्त व जिवबा नाना जाधव पार्क परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.