शिरोलीत रूढी, परंपरेप्रमाणे दसरा सोहळा संपन्न
शिरोली (पुलाची ) – येथील दसरा मैदानात संस्थान कालीन परंपरेच्या स्मृती जागवणारा सिमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला, शिरोलीतील गावाकामगार पोलीस पाटील घराण्यातील मानकरी राजेश पाटील आणि सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली ढोल खैताळा तालावर भंडाऱ्याची उधळण करीत गावातील मान्यवर सहभागी झालेली पालखी मिरवणूकीची म्हसोबा मंदिरातून सुरवात झाली.
पालखी मिरवणुकीत ग्रामपंचायत मार्गे बिरदेव मंदिराजवळ आली. याठिकाणी बिरदेव आणि म्हसोबाच्या दोन्ही पालख्यांची भेट झाली. या दोन्ही पालख्या जयशिवराय तालीम मार्गे दसरा मैदानात ढोल ताशांच्या गजराल दाखल झाल्या. यावेळी गावकामगार पाटील घराण्याचे मानकरी राजेश पाटील यांचे हस्ते आपट्याच्या पानावर तलवार मारून सोने लूटण्यात आले. त्यानंतर दोन्ही पालख्या पुन्हा बिरदेव मंदिरात आल्या. याठिकाणी पारंपरिक विधीसह बिरदेवाची आरती करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात – वडगांव शेती उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश पाटील, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पंकज गिरी, सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे, माजी सरपंच विठ्ठल पाटील, राजाराम साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, निवास कदम, अविनाश कोळी, डॉ.. सुभाष पाटील, उद्यसिंह पाटील , विजय जाधव, धनाजी पाटील, योगेश खवरे, नितीन चव्हाण, पांडुरंग तावडे, राजाराम चौगुले, आकाराम दिंडे, दिपक यादव, बाबासो कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष- सतिश पाटील, जगन्नाथ पाटील, महादेव सुतार, ऋषिकेश सरनोबत, रत्नसिंह पाटील , यश पाटील, अनिल शिरोळे, शिवाजी उनाळे, बापू पुजारी, विश्वास गावडे, नागनाथ गावडे, बाळासो पुजारी, संदीप तानवडे, प्रल्हाद खोत, कुमार पाटील, डी. एम. चौगुले (सर), विश्वास गावडे, जी.पी. यादव (सर), अनिकेत पाटील, बाबासो बुधले, लखन घाटगे, रावसो घाटगे, भुपाल कांबळे आदिंसह ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
