डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे अधिवेशन २८ आणि २९ जानेवारीला कोल्हापूरात
कोल्हापूर : डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे अधिवेशन २८ आणि २९ जानेवारी २०२४ या कालावधीत कोल्हापूरच्या सिद्धगिरी कणेरीमठ येथे होणार आहे,अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संपादक राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली
२९ जानेवारी रोजी सकाळच्या क्षेत्रातील अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तसेच महाराष्ट्र महागौरव व डिजीटल स्टार महागौरव पुरस्कार २०२४ वितरण केले जाणार आहे. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, आयुष्यमान भारत-मिशन महाराष्ट्र समितीचे डॉ. ओमप्रकाश शेटे या मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्विकारले आहे.
अधिवेशन निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील डिजिटल मीडियातील संपादक पत्रकार एकत्र येत आहेत. अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या आदर्श व्यक्तिंचा गौरव केला जाणार आहे. त्यामध्ये पुरस्कार प्राप्त मान्यवर -वर्षा तुळशीदास लांजेवार (चंद्रपुर-महिला शेती चळवळीच्या प्रणेत्या), प्रा. शिवराज मोटेगावकर(लातुर-शिक्षण तज्ज्ञ), तुकाराम व रागिणी कंदकुरे (छत्रपती संभाजीनगर-उद्योग क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी), विकास थोरात (सातारा-प्रकल्पग्रस्तांना मोबदला प्रश्नांवर लढा), विद्या गुलाबराव पोळ (कोल्हापूर-ग्रामीण भागातील शिक्षणाच्या प्रसार कार्यात महत्वूपर्ण योगदान), डॉ. प्रिया शिंदे व डॉ. अरुणाताई बर्गे (सातारा-आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. कणेरी मठ चळवळीत सक्रीय सहभाग), डॉ. भारती चव्हाण (पुणे-मुलाच्या नावापुढे आईचे नाव लावण्याची चळवळ), प्रवीण माळी (सांगली-आर्किटेक्ट शास्त्रात विशेष योगदान), शशिकांत धोत्रे (सोलापूर-जागतिक किर्तीचे पेन्सिल चित्रकार), विशाल परब (सिंधुदूर्ग-यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते), डॉ. राहुल शिवाजीराव कदम (पुणे-साखर उद्योग आणि समाजकार्यात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी), प्रकाश औंताडे (सांगली-कृषि उत्पन्न वाढीत विशेष उल्लेखनीय कामगिरी), नंदिनी गायकवाड (पुणे-अंबिका मसाले यशस्वी उद्योजक), डिजीटल स्टार महागौरव पुरस्कारप्राप्त मान्यवर : कृष्णराज महाडिक (कोल्हापूर-डिजिटल माध्यमात नवा इतिहास), संजय श्रीधर कांबळे (पुणे-डिजीटल क्षेत्रात दिशादर्शक कार्य), नागनाथ सुतार (पंढरपूर-उच्च तंत्रकौशल्याला बातमी मूल्यांची जोड) आदींचा समावेश आहे.
पत्रकार परिषदेला संघटनेचे सुहास पाटील, सतीश सावंत, विकास भोसले, भाऊसाहेब फास्के, प्रशांत चुयेकर, सचिव धीरज रुकडे, प्रशांत कटारे विजय कोरे आदी उपस्थित होते.
