शहरालगतच्या ग्रामीण भागातील ६५ अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडून अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत करणेची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअतंर्गत मंगळवारी शहरालगतच्या ग्रामीण भागातील ६५ अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर कारवाई करण्यात आली. नागदेव कॉलनी, बालाजी पार्क, महालक्ष्मी कॉलनी, भूमिनंदन कॉलनी, मथूरा नगरी या शहरालगतच्या ग्रामीण भागात करण्यात आली. यामध्ये प्रशांत सावंत, रमेश बामणे, विनायक ठोमके, आनंदा पाटील, उत्तम पाटील, मारुती जाधव, मंगेश अन्नछत्र, विनायक राणे, तुषार चौगले, श्रृषिकेश लोखंडे, सचिन पाटील, मोहन कुंभार, भाऊसाो पाटील, सविता गायकवाड, उत्तम पाटील, सुमन थट्टेवाले, अंकुश कदम, अंजली बंडगर, अजिंक्य विंचू, सदाशिव हाळवे, शुभम बामणे, समीर ठक्कर, रणजीत जाधव, राजाराम शेळके, संतोष गावडे, रवी घाडगे, लक्ष्मण जाणकर, अमीतकुमार नलवडे, प्रमेश त्रिमुखे, कल्पना सिताराम कांबळे, साबीया निसार शेख, तेजस चंद्रकांत माने, सुनिल रावसो कदम, समशेरसिंह शंकरसिंह रजपूत, विरेंद्र विजयराव यादव, प्रमोद आवळे या लोकांची अनाधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्यात आली. यावेळी या सर्वांना दंडात्मक कारवाईची सात दिवसांची नोटीस लागू करण्यात आलेली आहे. अनधिकृत नळ कनेक्शन जोडून देणाऱ्या प्लंबरवर देखील महापालिकेच्यावतीने फौजदारी कारवाई होणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत यांचे मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता प्रिया पाटील, पाणीपट्ठी अधिक्षक प्रशांत पंडत, ए वॉर्ड गांधी मैदान विभागातील सर्व मिटर रिडर व सहाय्यक, फिटर यांनी केली. अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात पाणी पुरवठा विभागामार्फत चालू आहे, शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांनी रितसर महानगरपालिकेची परवानगी घेवून, आवश्यक ती फी भरून आपले कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. अन्यथा त्यांचे पाणी कनेक्शन खंडीत केले जाईल असे पालिकेने म्हटले आहे.
