शिवसूत्र मंडळ आयोजित शिबिरात १०५ जणांचे रक्तदान
शिरोली पुलाची : येथील शिवसूत्र तरुण मंडळाच्या वतीने श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात १०५ जणांनी रक्तदान केले. मंडळाचे अध्यक्ष नितीन दळवी यांच्या हस्ते रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल खवरे, माजी सरपंच शशिकांत खवरे, माजी उपसरपंच सुरेश यादव, युवासेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण, शाहू आघाडीचे नेते विजय पोवार, नितीन गावडे, शिवाजी पाटील, उत्तम पाटील,संतोष बाटे, सतिश रेडेकर, विनायक पाटील आदी उपस्थित होते. नितीन दळवी यांनी आभार मानले.
