November 2, 2025

प्रचाराला येणार, निवडून आणणार, विजयी सभेलाही येणार : उद्धव ठाकरे

0
IMG-20240321-WA0299

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरात श्रीमंत शाहू छत्रपती यांची न्यू पॅलेसवर जाऊन भेट घेतली. शाहू महाराज उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी पुढे येऊन त्यांनी गळाभेट घेतली.
महाविकास आघाडीची काँग्रेसकडून उमेदवारी घेतलेले श्रीमंत शाहू महाराज यांच्या खास भेटीसाठी उद्धव ठाकरे कोल्हापूरात आले. तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर होते. न्यू पॅलेसवर उभायतांच्या उमेदवारी, राजकीय परिस्थिती, प्रचार यंत्रणा, यावर अर्धा तास चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिक शाहू महाराजांनां निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करतील असे अभिवाचन दिले. याबरोबरच पुन्हा प्रचारासाठी आणि विजयी सभेसाठी येणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यात ऋणानुबंध होते. ते या पिढीत आणि पुढच्या पिढीतही कायम राहतील असा निर्वाळा त्यांनी दिला. महाराजांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसैनिक ताकतीने प्रचार करून त्यांना विजयी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. या निवडणुकीमध्ये मराठी अस्मितेचा प्रश्नही असणार आहे. शाहू महाराज यांच्या प्रचार सभेला आणि विजय सभेला मी येणार आहे.

या निमित्ताने मी माझा स्वार्थ साधला आहे, असा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, आम्ही सगळे या निवडणुकीत एका विचाराने लढत आहे. त्यासाठी शाहू महाराज यांचे आशीर्वाद पाहिजे होते. ते घेऊन आता पुढे प्रचाराला निघालो आहे. शाहू महाराजांची भेट झाल्याने आज मनापासून आनंद झाला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे तेजस ठाकरे उध्दव ठाकरे, युवा नेते तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, यांचे स्वागत शाहू महाराज व मालोजीराजे छत्रपती यांनी केले. यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रवीकिरण इंगवले पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page