November 1, 2025

मंदिरे आणि देव-देवतांवरील श्रद्धेमुळेच समाजात सत्कार्याची ओढ : पालकमंत्री हसन मुश्रीफ

0
WhatsApp Image 2023-12-23 at 9.00.41 PM

ऊत्तूर : विविध देव-देवता आणि मंदिरे ही समाजाची श्रद्धास्थळे आहेत. त्यामुळे समाज अनीतीपासून राहुन सत्कार्याची ओढ लागते, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
उत्तुर ता आजरा येथे इंदिरा नगरातील श्री. स्वामी समर्थ कॉलनीमध्ये पालकमंत्री मुश्रीफ यांच्या ७० लाख निधीतून बांधलेल्या श्री. दत्त पंत समर्थ मंदिराच्या वास्तुशांती व लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उत्तुरकर ग्रामस्थ, मुंबई व पुणे येथील उत्तुर ग्रामस्थांचे अवधूत भजनी मंडळ यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. डाॅ. श्री. एस. डी. पन्हाळकर महाराज होते.
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, मंदिरांमुळे समाजात सदाचाराची वृत्ती वाढीस लागते. उत्तुरच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आजवरच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीमध्ये सातशेहून अधिक मंदिरे बांधली. या माध्यमातून त्यांनी धार्मिक, अध्यात्मिक आणि सांप्रदायिक चळवळीला नेहमीच पाठबळ दिले आहे. उत्तुर गावासह उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वच गावांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोट्यावधींचा निधी देऊन या भागाचा कायापालट केला आहे.
यावेळी सरपंच किरण अमनगी, वसंतराव धुरे, मारुतीराव घोरपडे, शिरीष देसाई, महादेवराव पाटील, काशिनाथअण्णा तेली, गंगाधर हराळे, गुरुवर्य आकारम महाराज, दिपकराव देसाई, विजय वांगणेकर, मारुती दिंडे, जोतिबा पोवार, पांडुरंग सांगले, सुधीर जाधव, प्रभाकर फाळके, दिनकर कुंभार, भिकाजी येजरे, समीर कुंभार, परसू तिबिले आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page