श्वेता गायकवाड यांची भाजप सरचिटणीसपदी निवड
- कोल्हापूर : येथील श्वेता कुलदीप गायकवाड यांची जिल्हा महानगर महिला मोर्चा सरचिटणीसपदी निवड झाली. या निवडीचे पत्र नुकतेच भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
- आगामी काळातील निवडणूक लक्षात घेता जिल्ह्यातील महिला मोर्चाची बांधणी करून नवनवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून पक्ष संघटनेचे काम वाढवण्याबरोबरच जनतेपर्यंत सरकारच्या योजना व कामची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. पक्षाच्या अनेक कार्यक्रमामध्ये असणारा त्यांचा सहभाग पाहून त्यांची निवड केल्याचेही पत्रात म्हटले आहे. कोल्हापूर सराफ संघाचे माजी अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या त्या पत्नी आहेत. दरम्यान, निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
