November 2, 2025

राज्य शासनाच्या सुंदर गाव स्पर्धेत पुलाची शिरोली ग्रामपंचायत प्रथम

0
20200706_231352

शिरोली : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या माजी ग्रामीण विकास मंत्री आर .आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली ग्रामपंचायतीला तालुका स्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
सन २०२२-२३ मध्ये सुंदर गाव या योजने अंतर्गत केलेल्या कामाची सन २०२३-२४ मध्ये क्रॉस तपासणी करण्यात आली होती. यामध्ये शिरोली ग्रामपंचायतीस शंभर पैकी ९१ गुण मिळालेआहेत. या पुरस्कारामुळे दहा लाखाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. हि घोषणा गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी केली आहे.
ग्रामपंचायतीने राबविलेला घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी नियोजन, अंतर्गत स्वच्छता, शासकीय योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी, माझी वसुंधरा उपक्रम, विज बचत (एलईडी योजना), साथीच्या आजार होवू नये यासाठी घेतलेली खबरदारी अशा अनेक कामांचा केलेला पाठपुरावा यामुळे शिरोली ग्रामपंचायत बक्षिसास प्राप्त ठरली आहे. आता जिल्हा पुरस्काराच्या दृष्टीने पुढील काळात कामकाज करणार असल्याचे सरपंच सौ. पद्मजा करपे व ग्रामविकास अधिकार ए.वाय.कदम यांनी सांगितले. तसेच त्यांनी ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य केले बद्दल आभार मानले आहेत. या पुरस्काराबद्दल ग्रामस्थांच्याकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page