November 4, 2025

शाहू महाराज यांचा प्रचंड शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

0
20240416_191903

कोल्हापूर : सळसळत्या, उत्साहवर्धक वातावरणात लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांनी मंगळवारी (दि.16 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीने प्रचंड शक्तिप्रदर्शन करत एकजूट दाखवून दिली.

रणरणत्या उन्हाची तमा न करता जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यामुळे दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर अक्षरश: महाजनसागर लोटला होता. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या जनतेने शाहू छत्रपतींच्या विजयाचा निर्धार पक्का केला. हात उंचावत कोल्हापूरची अस्मिता शाहू छत्रपती, शिवशाहूंचा विचार दिल्लीला पाठवू या अशा घोषणा देत या समुदायाने संपूर्ण जिल्हा महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचे ग्वाही दिली.

फुलांनी सजवलेल्या वाहनात खास तयार करण्यात आलेल्या ओपन टफमध्ये श्री शाहू छत्रपती यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षातील प्रमुख नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, शरद पवार गट राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्‍वास नारायण पाटील, शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर, माजी आमदार सुरेश साळोखे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, माजी संचालक रामराजे कुपेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  वसंतराव मुळीक, आपचे संदीप देसाई, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे यांच्यासह विविध संस्था, संघटना व पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती या रॅलीमध्ये सहभागी होत्या. मिरवणूक मार्गावर ‘कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, जनतेचा निर्धार… शाहू महाराज खासदार’ ही घोषणा दुमदुमली.
सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे झेंडे हाती घेऊन आणि महाराजांच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते वाजत गाजत पोहोचले. धनगरी ढोल पथक, हलगीचा कडकडाट यामुळे वातावरण जल्‍लोषी बनले. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा अशा प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग होता. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, आरपीआय, भाकप, माकप, लाल बावटा, संभाजी ब्रिगेड, लोकजनशक्ती पार्टी अशा विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व शहरातील वेगवेगळ्या संस्था, तालीम संघटना, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. <span;>इंडिया आघाडी व महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या 28 हून अधिक पक्षांच्या प्रमुखांचा, पदाधिकार्‍यांचा व कार्यकर्त्यांचा या मिरवणुकीत सहभाग होता. यातून महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन घडले.महिलांची उपस्थितीही मोठी होती.
रॅलीच्या अग्रभागी धनगरी ढोल व हलगी पथक होते. त्या पाठोपाठ कार्यकर्त्यांचा ताफा होता. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांचे, पदाधिकार्‍यांचे प्रतिमा असलेले फलक घेऊन कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. ‘कोल्हापूरच्या विकासासाठी-शाहू महाराज… जनतेसाठी कोल्हापूरचा एकच आवाज-शाहू महाराज….. कोल्हापूरची अस्मिता, कोल्हापूरचा स्वाभिमान-शाहू महाराज…. जनतेचा निर्धार-शाहू महाराज खासदार’ या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले.  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे ‘हिंदुत्वाची साद, उद्धवजींना साथ,’ या मजुकराचे फलकही लक्ष वेधून होते. ‘आमचं ठरलंय गद्दारांना मतदान नाही, चला गद्दारांना गाडायला, शाहू छत्रपतींचा फॉर्म भरायला’अशा मजकुराच्या फलकातून कार्यकर्त्यांनी फुटीर खासदारांना इशारा दिला.
नागरिकांना अभिवादन करत रॅली दसरा चौक, व्हिनस कॉर्नर मार्गे पुढे मार्गस्थ झाली. हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने या मार्गावर जनसागर लोटल्यासारखी स्थिती होती. बसंत बहार रोड मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीच्या प्रमुख निवडक नेते मंडळीसोबत जाऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. शाहू छत्रपती यांनी 4 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी व रविकिरण इंगवले, शेकापचे युवा नेते क्रांती पवार-पाटील, अक्षय पवार-पाटील, सरचिटणीस बाबुराव कदम, भोगावती कारखान्याचे संचालक केरबा पाटील, दत्ता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासोा देवकर, काँग्रेसचे पदाधिकारी सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, सरलाताई पाटील, बाळ पाटणकर, दौलत कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, शिवराज संकुल, गडहिंग्लजचे अध्यक्ष प्रा. किसन कुराडे, जनता दलाचे वसंतराव पाटील, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरे, डॉ. नंदाताई बाभूळकर, राष्ट्रवादीचे अमर चव्हाण, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दगडू भास्कर, लोकजनशक्ती संघटनेचे बाळासो भोसले, माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, भीमराव पोवार, सागर चव्हाण, स्वाती यवलुजे, निलोफर आजरेकर, कॉ. अतुल दिघे, कॉ. दिलीप पवार, कॉ. चंद्रकांत यादव, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, अंबरिश घाटगे, पी. डी. धुंदरे, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, डॉ. रमेश जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, प्राचार्य टी. एस पाटील, प्रा. जे. के. पवार, माजी उपमहापौर विक्रम जरग, श्रीमती सुलोचना नाईकवडे, अर्जुन माने, माजी नगरसेवक जितेंद्र सलगर, राजाराम गायकवाड,  प्रतापसिंह जाधव, रामदास भाले, ईश्वर परमार, मधुकर रामाणे, दिलीप शेटे, नियाज खान, रमेश पोवार, दत्ता टिपूगडे, राहूल चव्हाण, प्रकाश नाईकनवरे, उद्योगपती डी. डी. पाटील, रामराजे बदाले, मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, सुशील पाटील-कौलवकर, शिवशाहू संघटनेचे सज्जन पवार, वंचितचे नितीन पाटील, बाबासाहेब चौगुले, पर्यावरण कार्यकर्ते उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page