December 27, 2025

शाहू महाराज संपत्तीचे वारस, मी रक्तामांसाचा वारस : राजवर्धन कदमबांडे

0
sarkarnama_2024-04_d0d36fcc-ce5a-4326-bf3d-d66656cc5ad3_Rajavardhan_Kadambande_news

कोल्हापूर : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणात उतरल्यानंतर आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपने याच घराण्याचे वंशज असलेले राजवर्धन कदमबांडे यांना धुळे येथून कोल्हापूरात पाचरण केले. आणि त्यांच्या करवी भाजपची भूमिका मांडून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मते देण्याचे आवाहन कोल्हापूरच्या मतदारांना करावयास लावले. याला छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी कोल्हापूरात स्पेशल विमानाने दाखल होत, पत्रकारपरिषद घेतली. पी एम नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दत्तक विधानाशी संबंधित असलेले राजवर्धनसिंह कदमबांडे कोल्हापुरात आले होते.  त्यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट करताना सांगितले. वारसदार कोण हा आमचा घरगुती वाद आहे त्याबद्दल जास्त बोलणार नाही, दत्तक घेताना काय वाद झाला होता याबद्दल आपण सगळे जाणून आहात, अशी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज रिंगणात आहेत कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज रिंगणात आहेत. यावेळी त्यांनी मी शाहू महाराजांचा रक्तामासांचा वारसदार असल्याचं म्हटले. पण आताचे शाहू महाराज हे केवळ संपत्तीचे वारसदार आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना विजयी करा असे आवाहन केले.
धुळ्यात जास्त कार्यरत राहिल्याने कोल्हापूरकडे थोडं दुर्लक्ष झालं. कुणी सांगितलं की भाजप राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांच्या विरोधात आहे. मी कोणताही जुना वाद बाहेर काढण्यासाठी आलो नाही, तो आमचा घरगुती वाद आहे. मी आता केवळ महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी आलो असल्याचे म्हणाले. ‘मी काही संपत्तीचा वारसदार नाही. मी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदार संघात मी भाजपचा प्रचार करणार, भाजप पक्ष शाहू महाराजांच्या विचारांच्या विरोधात आहे हे कोणी सांगितले?’ असा सवालही त्यांनी केला.
कदमबांडे पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल बोलणार नाही,  मी सध्या धुळे शहरात काम करतो, त्याच ठिकाणी राजकीय आणि सामाजिक काम करतो. कोल्हापूरच्या जनतेची इच्छा असेल आणि भाजपने सांगितले तर कोल्हापुरात सक्रिय होईन.  असंही ते म्हणाले. यावेळी कोल्हापूरचे भाजपा नेते माजी महापौर सत्यजित कदम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page