शाहू महाराजांची न्यू पॅलेसवर माजी सैनिक, जनतेसोबत रंगपंचमी
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी आज रंगपंचमीच्या निमित्ताने न्यू पॅलेस येथेच उपस्थित राहून भेटीगाठी साठी येणाऱ्या सामाजिक संघटना आणि मतदारांबरोबर रंगमंचमी साजरी करून केली. माजी सैनिक संघटनेच्यावतीने श्रीमंत शाहू छत्रपती यांना तब्बल एक लाख मतदान मिळवून देण्याचे आश्वासन देताना शाहू महाराजांनी निवृत्त सैनिकांच्या साठी केलेले योगदान फार मोठे असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
श्रीमंत शाहू महाराज आज लोकांच्या भेटीसाठी घेण्यासाठी न्यू पॅलेस वरच थांबून येते होते. आज रंगपंचमीच्या निमित्ताने त्यांनी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भगवा, पांढरा आणि हिरवा असे तिरंगी रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे म्हणाले की आजी-माजी सैनिक निवृत्त अधिकारी यांचे आणि शाहू महाराजांचे नाते कायमपणे जिव्हाळ्याचे आहे. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी त्यांनी कायमच मदतीचा हात पुढे केला आहे. तब्बल 17 एकर जमीन त्यांनी माजी सैनिक संघटनेला दिली असल्यामुळेच सैनिक दरबार हॉलसह सैनिकांसाठी अनेक सुविधा निर्माण झाल्या. त्यामुळे जिल्ह्यात 22 हजार माजी सैनिक सभासद असलेली ही संघटना आणि त्यांचे सर्व कुटुंबीय असे एकूण एक लाखाहून अधिक मतदार आणि जनता त्यांच्या पाठीशी या निवडणुकीत खंबीरपणे उभी राहील. निवडणुकीसाठी ‘कमी तेथे आम्ही’ या भावनेने ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी सर्व माजी सैनिक येऊन काम करतील. अशी ग्वाही त्यांनी दिली. मेजर सुभेदार आणि ऑनररी कॅप्टन तानाजी खाडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मराठा रायफल आणि राजाराम रेजिमेंट या राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या बटालियनच्या माध्यमातून सियाचीन आणि देशाच्या सीमेवर आम्हाला लढण्याची संधी आणि प्रेरणा मिळाली. हे आणि भाग्य समजतो. यापुढे आम्ही श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या सोबत कायम राहू.
यावेळी यावेळी बामसेफ संघटनेचे काही अधिकारी पदाधिकारी तसेच राधानगरी तालुक्यातील अनेक संघटना मतदार आणि कार्यकर्ते यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. तसेच राधानगरी तालुक्यात राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून राधानगरी तालुक्यासह
संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे कल्याण केले आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी तालुक्यातील घराघरात जाऊन आम्ही प्रचार करू आणि जास्तीत जास्त मताधिक्य देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी माजी जि. प. सदस्य हिंदुराव पाटील, गोकुळचे माजी संचालक पी. डी.धुंदरे, अमर पाटील, मधुकर रामाणे, सदाशिव भांदीगरे,नामदेव पाटील, बाजीराव चौगुले, ए. डी. चौगुले मोहन डावरे, अशोक चौगुले, जयवंत कांबळे आदी उपस्थित होते.
