मराठा आरक्षणासाठी खासदारांची दिल्लीत बैठक : संभाजीराजे निमंत्रक
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी एकमताने संसदेत आवाज उठवावा यासाठी माजी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.00 वाजता महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे ही बैठक आयोजित केली आहे.
महाराष्ट्रात ऐरणीवर असलेला मराठा आरक्षण या विषयी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, याकरिता संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे.
बैठकीस संभाजीराजे यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांना निमंत्रित करण्यात आले असून यामध्ये शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील खासदार असलेल्याबड्या नेत्यांचाही समावेश आहे. हे खासदार नेते उपस्थित राहणार का, आणि काय भूमिका मांडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…
