विजयाचा गुलाल लावूनच रंगपंचमी साजरी करणार : संभाजीराजे
कोल्हापूर : शाहू महाराजांच्या विजयाचा गुलाल लावूनच रंगपंचमी साजरी करणार असा निर्धार माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.
श्रीमंत शाहू छत्रपती न्यू पॅलेस वर भेटायला येणाऱ्या सर्वांना भगवा, पांढरा, हिरवा असा तिरंगी रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत होते. त्याचवेळी युवराज माजी खा.संभाजीराजे, माजी आ. मालोजीराजे, सौ संयोगिताराजे हे निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यात व्यस्त होते. या ठिकाणी उपस्थित असलेल्या संभाजीराजे यांना जवळच्या काही स्नेही मंडळींनी रंग लावण्याचा आग्रह केला. पण त्यांनी नम्रपणे नकार देताना मी आज रंग लावणार नाही आणि लावूनही घेणार नाही आता शाहू महाराजांच्या विजयाचा गुलाल लावूनच रंगपंचमी साजरी करणार असे सांगितले. यावेळी स्वतः शाहू महाराजांनी संभाजीराजेंना जवळ बोलवून त्यांना रंग लावला पण संभाजी राजेंनी मात्र त्यांना किंवा कोणालाच रंग लावला नाही.
