राजू शेटटींची भव्य रॅली, बैलगाडीतून सवारी, युती-आघाडीवर तोफ
                कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विराट शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस्फुर्तपणे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अर्ज दाखल करण्यासाठी ते दसरा चौकातून बैलगाडीत उभे राहून रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
तत्पूर्वी त्यांनी घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांच्यासह उद्धव ठाकरे यांचे समर्थन असताना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला नसल्याची सल व्यक्त करीत महायुती आणि महाविकास आघाडीवर तोफ डागली.
ते म्हणाले खोक्याचा बाजार करणारी झुंड एका बाजूला माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसे , विचारवंत माझ्यासोबत आहेत.  त्यांनी केला. आधी उद्धव ठाकरे उमेदवार देणार नव्हते, पण चाव्या कोठून फिरल्या माहीत नाही,  सगळे कारखानादार हातकणंगलेमध्ये काड्या करण्यात सामील असल्याचा आरोप करताना
यामध्ये जयंत पाटील, सतेज पाटील असावेत असा थेट आरोप केला.     काहीजण ईडीला घाबरून भाजपात जात आहेत. विरोधकांतीलही काहीजण अजून जातील. ईडी कार्यालयावरच मोर्चा काढावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण ईडीला मी हिंगलत नाही, मला एकदा नोटीस पाठवावीच असे आव्हान देऊन आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या पुढील चळवळीची दिशा स्पष्ट करताना त्यांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून यापुढी लढा विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगारासाठी उभारणार असल्याचे सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजू शेट्टी यांचेसोबत सावकार मादनाईक, वैभव कांबळे,सतिश काकडे राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक व्ही. एम. सिंग होते. 
