संसदेतील हल्ल्याच्या घटनेवर मोदींनी व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याची घटना चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी चिंता व्यक्त करून आपले मत मांडले.
संसदेत घडलेली घटनेमुळे आपल्या देशाची प्रतिमा मलीन होते, त्यावर परिणाम होतो. यासह अशा घटना चिंताजनक आहेत. यामुळे घटनेच्या खोलात जाणं आवश्यक आहे. ही घटनामागे कोण आहे, जाणून घेणं आवश्यक आहे. या घटनेमागील काय उद्देश होता. आरोपींचा हेतू काय होता, हे जाणून घेतल्यानंतर आपल्यासमोर सर्व चित्र स्पष्ट होईल. या घटनेमागील हेतू जाणून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणालेत. ही घटना दुखद असल्याचं म्हटलंय. याप्रकरणी वाद-विवाद करू नये. या घटनेमागे कोण आहे, याचा तपास केला गेला पाहिजे. असेही ते म्हणाले
