जनताच गनिमी काव्याने भाजपचा कार्यक्रम करणार : आ. सतेज पाटील
कोल्हापूर : जिल्ह्यात महाविकास आघाडीचे जागावाटप शंभर टक्के पूर्ण झालय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आम्ही एकत्र महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे जाऊन आमचा स्ट्राईक रेट मॅक्झिमम कसा असेल हे पाहणार आहोत. कोल्हापूर उत्तर मधून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती. मात्र विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी देखील आपलं मोठ मन दाखवत आपण जो निर्णय घ्याल तो मान्य असेल असे सांगितले. यामुळे एक तरुण कार्यकर्ता म्हणून राजेश उर्फ राजू लाटकर यांची निवड केली असे आ.सतेज पाटील म्हणाले आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच २९ तारखेला शक्तिप्रदर्शन करत आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत असे राष्ट्रीय काँग्रेसचे विधान परिषदेचे घटनेचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटल आहे हे आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले ही निवडणूक विश्वासार्हतेवर असेल. गेले पाच वर्ष या जनतेचा विश्वास घात झालेला आहे. ही निवडणूक पुढच्या काळातील विश्वासधारक राजकारणासाठी असेल. महाविकास आघाडी म्हणून हा विश्वास देण्याचा आमचा प्रयत्न असेल
राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा कार्यक्रम जवळपास संपला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले असून काँग्रेस कडून जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोल्हापूर उत्तरच्या जागेवरील वाद देखील आता मिटला असून महाविकास आघाडीत कोल्हापूर उत्तर ची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे तर येथून राजेश उर्फ राजू लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली असून यानंतर सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी कधी मिळणार हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जात असतो. मात्र यंदा आम्ही पहिल्यांदा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून महापालिकेत काम केलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.
दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुती करून देखील राजेश क्षीरसागर यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसने विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा तिकीट कापून एका स्त्रीचा अपमान केल्याची टीका क्षीरसागर यांनी केली होती. याला देखील आ सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर देताना, सुजय विखेंचा कार्यक्रमात जयश्री ताईंच्या बद्दल काय बोललं गेलं हे आधी राजेश क्षीरसागर यांनी एकदा ऐकाव. आता त्यांना सगळं आठवत आहे. मात्र त्यांच्या स्वतःच्या पक्षात लोक काय करत आहेत याचा त्यांनी विचार करायला हवा. निवडणुका आहेत म्हणून ते टीका करत आहेत मात्र शहराला विकासात्मक चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.जनतेतला मोटर सायकल वरून जाणारा आमदार निवडून यावा अशी लोकांची अपेक्षा आहे आणि लोक त्याला प्रतिसाद देतील असे पाटील म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडी बद्दल सुरू असलेल्या बंडखोरी रोखण्यासाठी इच्छुकांना समजावून सांगितलेला आहे आज ए वाय पाटील यांचा देखील त्यांनी अपक्ष लढू नये अशी समजूत काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. लोकसभेला ते आमच्या सोबत होते. त्यामुळे त्यांनी याचा फेरविचार करावा Iजेणेकरून आम्हाला भविष्यात त्यांचा मान सन्मान ठेवता येईल असे ही पाटील म्हणाले आहेत.
निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचाराला जोर आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना सध्या विरोधक आमच्याशी गनिमी काव्याने लढत असून आम्ही त्या गनिमी काव्याचे उत्तर गनिमी काव्यानेच देणार आहोत असे म्हणाले होते. यासंदर्भात बोलताना त्यांचा गनिमी कावा त्यांच्यावरच उलटेल लोकसभेला देखील आपण पाहिला आहात. बदलापूर मध्ये झालेला अत्याचार अद्याप लोक विसरलेले नाहीत. मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, सोयाबीनला काय भाव मिळाला हे नागरिक विसरले नाहीत, महाराष्ट्र महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे लोक विसरलेले नाहीत यामुळे महाराष्ट्राची जनता आता गनिमी काव्याने भाजपचा कार्यक्रम करणार असल्याचं सतेज पाटील म्हणाले आहेत.
राज्यात केलेल्या विकास कामांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादी काढली तर त्यांना दिसेल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने किती काय काय काम केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर पण असेल, कारण गेले अडीच वर्ष ते आमच्या सोबत होते. शेतकऱ्यांची कर्ज माफी आम्ही केली, मेट्रोची संकल्पना काँग्रेसचे सरकार असताना आणली गेली आता ते उद्घाटन करत आहेत सगळ्याची सुरुवात काँग्रेसच्या काळात झाली आहे त्यामुळे ते बोलायचं म्हणून बोलत असतील असे सतेज पाटील म्हणाले आहेत.
