संसदेची सुरक्षा आता सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स कडे
केंद्र सरकारने संसदेची सुरक्षा सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. CISF ही केंद्रीय लष्कर दलाची एक विशेष तुकडी आहे. CISF ही केंद्र सरकारच्या अनेक इमारतींची सुरक्षा करते. १३ डिसेंबर रोजी संसदेत सुरक्षाभंग झाला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
संसदेचा सुरक्षाभंग झाल्यानंतर संसद परिसराची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे देण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येतंय. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी यापूर्वी दिल्ली पोलिसांकडे होती. आता दिल्ली पोलिसांकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.
सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोघांनी लोकसभेचे कामकाज सुरु असताना घुसखोरी केली होती. त्यांनी पिवळ्या धूर कांड्या फोडल्या होत्या. संसदेच्या बाहेर देखील दोन तरुणांनी घोषणाबाजी करत पिवळ्या धूर कांड्या फोडले होते. या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. १३ डिसेंबर २००२ रोजी याच दिवशी संसदेवर हल्ला झाला होता. त्याच दिवशी हा प्रकार घडला असल्याने देशात दहशत निर्माण झाली होती.
CISF काय आहे?
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) भारताच्या केंद्रिय सशस्त्र पोलीस दलाचा भाग आहे. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल काम करत असते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याची स्थापना १० मार्च १९६९ रोजी झाली होती. महत्त्वाच्या उद्योग आणि संकुलांच्या संरक्षणासाठी जबाबदार CISF असते. यात रिफायनरीज, विमानतळ आणि CISF द्वारे संरक्षित सर्व केंद्रीय औद्योगिक संकुलांचा समावेश आहे
1,73,355 कर्मचार्यांच्या सध्याच्या संख्येसह हे दल सध्या देशभरातील 358 आस्थापनांना सुरक्षा कवच पुरवते. CISF ची स्वतःची फायर विंग देखील आहे जी वरीलपैकी 112 आस्थापनांना सेवा पुरवते. CISF सुरक्षा क्षेत्रात भारतातील महत्वाच्या पायाभूत सुविधा आण्विक प्रतिष्ठान, अंतराळ आस्थापना, विमानतळ, बंदरे, वीज प्रकल्प इत्यादींचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, CISF महत्वाच्या सरकारी इमारती, प्रतिष्ठित वारसा स्मारके आणि दिल्ली मेट्रोचे संरक्षण करते.
