पंचगंगा सह. बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
कोल्हापूर : येथील पंचगंगा नागरी सह. बँकेच्या संचालक पदाच्या 15 जागेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. कोल्हापुरातील स्वच्छ कारभार असलेली नामांकित बँक म्हणून पंचगंगा बँकेची ओळख आहे. बॅंकेशी संबंधित जेष्ठ नेते मंडळींनी विशेष प्रयत्न केले.
जुन्या संचालकांशी चर्चा करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे अर्ज भरलेल्या काही उमेदवारांनी माघार घेतली. यापैकी गतवेळच्या आठ संचालकांनी माघार घेतली. तर नवीन आठ जणांना संचालक पदासाठी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीकडे बँकेच्या सभासदांचे लक्ष लागले होते.
बिनविरोध झालेले संचालक असे, विद्यमान अध्यक्ष राजाराम शिपुगडे, माधुरी कुलकर्णी, भालचंद्र साळोखे, चंद्रशेखर धर्माधिकारी, उपेंद्र सांगवडेकर, विजय चव्हाण, केशव गोवेकर, ॲड. राजेंद्र टोपकर , सीए रमेश भोसले, राजगोंडा पाटील, भगवान काशीद, सुनील पेठे, राकेश कापशीकर, सौरभ मुजुमदार, अंजली वालावलकर.
