मुश्रीफ-महाडिक यांची बुलेटवरून ‘राजकीय’ रपेट
कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे भाजपचे नेतृत्व आहे. हे दोन्ही नेते आज जिल्हा पोलीस दलाच्या वाहने प्रदान समारंभाच्या निमित्ताने एकत्र होते. वाहने पुजानाचा औपचारिक कार्यक्रम पार पडल्यानंतर या वाहनाच्या ताफ्यातील बुलेट चालवण्याचा मोह आवरलं नाही. ते बुलेटवर स्वार झाले आणि ना. हसन मुश्रीफ यांनाही मागील सीटवर बसवले आणि पोलीस ग्राऊंडवर एक रपेट मारली. दोघांनीही बुलेटसावरीचा आनंद घेतला.
एके काळी राष्ट्रवादी पक्षात एकमेकांसाठी झटणाऱ्या या नेत्यांच्यात बदलत्या राजकीय समीकरणातून अंतर पडले होते. पुन्हा राजकीय समीकरणाचे गणित जमले आणि सत्तेच्या झेंड्याखाली एकत्र आले. आता पुढील राजकीय वाटचाल एकत्र सुरु राहणार आहे तर ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असा संदेशच या बुलेट सवारीतून या दोन नेत्यांनी दिला.
