विकासकामांची पुस्तिका पाहून विरोधकांचे डोळे पांढरे होतील : ना.मुश्रीफ
कागल : मतदारसंघात कोट्यावधींचा निधी खेचून आणून विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या विकासकामांची पुस्तिका काढली जाणार आहे. ही पुस्तिका पाहून काहीजणांचे डोळे पांढरे होतील, असा टोला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना लगावला. मेतके (ता. कागल) येथे १० कोटी, ५६ लाखांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थनी गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे होते.
पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, चिकोञा धरणाच्या उभारणीचा पाया स्व. लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी घातला. तर ते पुर्णत्वास नेवून त्या धरणासह नागणवाडी धरणातील पाणी पुजनाचे भाग्य मिळाले आहे. आता भागात पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाला जातीचे दाखले देण्याचे आणि जातपडताळणी सुरू करण्यासाठी. तसेच, मराठा समाजाला जादाचे आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात खास अधिवेशन घेण्यासाठी पुढाकार घेवू, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी अंबरीश घाटगे म्हणाले, पालकमंत्री मुश्रीफ यांनी कागल मतदारसंघ सर्वांगसुंदर बनवत विकासाचे मॉडेल बनविले आहे. त्यांना पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी देवुया. माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत म्हणाले, ना. मुश्रीफ यांनी राजकारणाची व्याख्याच बदलत विकासाचे पर्व निर्माण केले आहे. सैनिकांप्रती नेहमीच आदर आणि प्रत्येक माणसाप्रती आत्मियता असणा-या ना. मुश्रीफ यांना यापुढेही बिनशर्त पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले
यावेळी विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बिद्रीचे संचालक रंगराव पाटील, माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, सदाशिव तुकान, नंदू पाटील, डी. पी. पाटील, मयूर आवळेकर, बाबासाहेब सांगले, सरपंच आक्काताई पाटील, उपसरपंच सरिता कामते, सतीश फेगडे, काशिनाथ पाटील, दादासो पाटील, राजेंद्र पाटील, दशरथ कामते,पांडुरंग पाटील उपस्थित होते.
स्वागत माजी उपसरपंच रणजीत पाटील यांनी व प्रास्ताविक पोलीसपाटील बाबासाहेब पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवलेकर यांनी तर काका पाटील यांनी आभार मानले.
