कोल्हापूर, हातकणंगलेत शिंदे गटाचे मंडलिक, माने यांनाच उमेदवारी
कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार? याची चर्चा सुरू होती. शिवसेना शिंदे गटाने आज राज्यातील आठजणांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये
कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आणि कोल्हापूरात महायुतीचे उमेदवार कोण? हा विषय संपला.
संजय मंडलिक यांना कोल्हापूरमधून तर धैर्यशील माने यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
कोल्हापूरात महायुतीतून पर्यायी नावाचा विचार सुरु होता. त्यामुळे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार की नाही अशी चर्चा होती. मात्र अखेर शिंदे यांनी पाठिंबा दिलेल्या खासदारांसाठी आपले महायुतीतील राजकीय वर्चस्व पणाला लावले. आणि कोल्हापूरतील दोन्ही खासदारांना उमेदवारी दिली. भाजपा हातकणंगले मतदारसंघात आपला उमेदवार देण्याच्या तयारीत होते. त्यामुळे खा. माने यांचे नाव मागे पडत होते. त्या ठिकाणी राहुल आवाडे, शौमिका महाडिक आणि विनय कोरे या बरोबरच कोल्हापूरात समरजित घाटगे यांच्या नावावर चर्चा होती. पण फारसे कोणी आग्रही नव्हते उमेदवारीबाबत कसलीही ताणाताणी झाली नाही. यामुळे माने, मंडलिक यांनी उमेदवारीमध्ये बाजी मारली आणि कोल्हापूरमधील दोन्ही लढतीचे चित्र स्पष्ट झाले.
राज्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आठ मतदारसंघ आणि उमेदवार – दक्षिण मध्य – राहुल शेवाळे, कोल्हापूर – संजय मंडलिक, शिर्डी – सदाशिव लोखंडे, बुलढाणा – प्रतापराव जाधव, हिंगोली – हेमंत पाटील
रामटेक – राजू पारवे, हातकणंगले – धैर्यशील माने
मावळ – श्रीरंग आप्पा बारणे
