November 1, 2025

महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून एक लाखांचे बक्षीस

0
WhatsApp Image 2023-12-23 at 3.02.04 PM

कागल : शिरोळची कन्या कु. अमृता शशिकांत पुजारी हिने मानाचा महिला महाराष्ट्र केसरी किताब पटकाविला. तिच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने तिला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. कागलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दै. पुढारीचे संपादक पद्मश्री डाॅ. प्रतापसिंह जाधव, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ, ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुनीलकुमार लवटे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार झाला.

यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महिला महाराष्ट्र केसरी पैलवान कु. अमृता ही शिरोळमधील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाढलेली महिला मल्ल आहे. ती साखर कारखान्यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांची मुलगी आहे. अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मिळविलेले तिचे हे यश आणि लौकिक आम्हा सर्वांनाच अभिमानास्पद आहे. तिच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला आणि सबंध देशालाच ऑलिंपिकमधील पदकाची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page