November 1, 2025

खिद्रापूराच्या महिला उपसरपंचांनी अविश्वास ठरावासाठी केले स्वतः विरोधात मतदान

0
grampanchayat-23_20180369850

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या महिला उपसरपंच यांच्याविरोधात दाखल केलेल्या बाजुने दहा विरुद्ध शुन्य मतानी मंजूर झाला. विशेष म्हणजे ज्यांच्या विरोधात हा ठराव होता त्या उपसरपंच पूजा शिवगोंडा पाटील यांनीही मतदान प्रक्रियेमुळे गोंधळून जाऊन ठरावाच्या बाजूने म्हणजे आपल्याच विरोधात मतदान केले.
राजकीय अपरिपक्वता अधोरेखीत करणारा अनोखा प्रकार घडला तो असा खिद्रापूर ग्रामपंचायतीमध्ये एकूण अकरा सदस्य असून आरक्षणाअभावी एक जागा रिक्त आहे. दरम्यान, उपसरपंच पूजा पाटील या मनमानी कारभार करीत असल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती.
अविश्वास ठराव मंगळवारी १०-० अशा एकमताने मंजूर झाला. मात्र, मतदान करताना उपसरपंच पुजा पाटील यांचाच तांत्रिक प्रक्रियेबाबत गोंधळ उडाल्याने त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे त्यांचे स्वतःच्या विरोधात मतदान पडले.
तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी या ठरावावर निर्णय घेण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेची अधिसूचना काढली होती. या सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या सभेत गुप्त मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. पीठासीन अधिकारी तहसीलदार यांनी मतदानापूर्वी सर्व सदस्यांना मतदान प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली. मात्र, मतदान करताना उपसरपंच पाटील यांचा गोंधळ उडाल्याने त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. तसेच सात सदस्यानी अविश्वास ठराव दाखल केला होता. प्रत्यक्ष इतरही दोन सदस्यानी ठरवा च्या बाजूने मतदान केले. म्हणजे सर्वच्या सर्व दहा सदस्यांचे उपसरपंच पुजा पाटील यांच्या विरोधात मतदान पडले आणि ठराव एकमताने मंजूर झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page