करवीरच्या पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादीत प्रवेश : राहुल पाटील
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 33;
कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा संपूर्ण गट २५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. भोगावती साखर कारखान्याला आर्थिक कोंडीतून आणि पी एन पाटील गटाच्या कार्यकर्त्याला राजकीय कोंडीतून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी राहुल पाटील म्हणाले की स्वर्गीय पी. एन. पाटील यांनी काँग्रेसचे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष आणि आमदार म्हणून काम केले. त्यांची, आणि आमच्या कुटुंबासह संपूर्ण गटाची काँग्रेस आणि गांधी घराण्यावर अपार निष्ठा होती. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेत होता. विलासराव देशमुख यांचासारखे राज्य आणि राष्ट्रिय पातळीवर काम करणारे नेते त्यांच्या पाठीशी होते. पण पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा गट आणि प्रत्येक कार्यकर्त्याची प्रचंड राजकीय कोंडी झाली. विधान सभेच्या निवडणूकीतही आमचा निसटता पराभव झाला. याबरोबरच भोगावती सहकारी साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढणे अशक्य झाले. सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती पहाता राजकीय, सहकार क्षेत्रात आवश्यक निर्णय घेणे अपरिहार्य आहे. मध्यंतरी आम्ही भाजप मध्ये जाणार असल्याची चर्चा होती पण आम्ही याबाबत कोणताही विचार केला नव्हता.
यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली त्यांनी भोगावती साखर कारखान्याला अर्थसहाय्यक आणि पी. एन. पाटील गटाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल असे आश्वासन दिले त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून आमचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील आणि मी सर्व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सडोली खालसा तालुका करवीर येथे होणार असून पक्ष नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
काँग्रेसचे नेते, जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांचेशी आपण चर्चा केली. त्यांनी आम्ही पक्ष सोडून जाऊ नये यासाठी प्रयत्नही केले. पण आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. आ. सतेज पाटील यांनी प्रत्येकवेळी पक्षपातळीवर मदत केली असल्याचेही त्यांनी सांगीतले.
प्रमुख विरोधक असलेले शिवसेना शिंदे गटाचे आ. चंद्रदिप नरके यांच्याशी महायुती म्हणून काय भूमिका घेणार याबाबत विचारले असता सर्वच निवडणूकीत नरके गटाला आमचा विरोधच राहील असेही राहुल पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, शिवाजीराव पाटील यांच्यासह गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
