जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीची निदर्शने : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर : राज्यात लागू करण्याच्या तयारीत असलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात आज इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारा हा कायदा तात्काळ रद्द करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना आ. सतेज पाटील म्हणाले की राज्यातील भाजप सरकारचा अजेंडा लोकांना अडचणीत आणणारा आहे. शक्तीपीठ, जनसुरक्षा कायदा, आरक्षणातील संभ्रमावस्था यातून हे सरकार महाराष्ट्र अशांत करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
इंडिया आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली लोकशाही मूल्यांचे गळचेपीचे षडयंत्र रचले जात आहे राज्यातील आंदोलनं, जनतेचे हक्क आणि सामाजिक प्रश्नांवर बोलणाऱ्या संघटनांना गप्प करण्याचा हेतू या कायद्यामागे दडलेला आहे. शासनाने हा कायदा त्वरित मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी इंडिया आघाडीचे नेते आम. सतेज उर्फ बंटी पाटील, उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हाप्रमुख वैभव उगळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, उपजिल्हाप्रमुख सातप्पा भवान, संदीप दबडे, युवासेना उपजिल्हाअधिकारी प्रतीक धनवडे, पन्हाळा तालुकाप्रमुख बाबा पाटील, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, विधानसभा प्रमुख विशाल देवकुळ, नगरसेवक राजू लाटकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत, उपतालुकाप्रमुख बाबासो शिंगे, युवराज घोरपडे तसेच इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
