शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने पेठ वडगावमध्ये नेत्र शिबीर
शिरोली : शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने गोकुळ संचालक माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांच्या मार्गदर्शनावाखाली पेठ वडगाव व परिसरातील गोर गरीब व गरजू ज्येष्ठ नागरिकांना आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले* यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान या शिबिरामध्ये सुमारे ७० नागरिकांची तपासणी करण्यात आली व ६ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी श्री टेके आय क्लिनिक, सांगली येथे नेण्यात आले.
यावेळी पेठ वडगावचे शिवसेना उपशहर प्रमुख सुनील माने म्हणाले सन २०१९ च्या पराभवाने खचून न जाता १० वर्षे डॉ. मिणचेकर साहेब आमदार असताना ज्या पद्धतीने सामाजिक कार्यात अग्रेसर होते. आजही त्याच जोमाने सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच गोकुळच्या माध्यमातून गोर-गरीब शेतकरी दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयन्त देखील ते करीत आहेत, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही गट-तट बाजूला ठेवून फक्त शिवसेना म्हणून एकत्र येवू व पुन्हा डॉ. मिणचेकर यांना शिवसेनेचा आमदार केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाहीत
यावेळी कार्यक्रमास शिवसेना उपशहरप्रमुख अंकुश माने, युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल माने, वाहतूक सेनेचे सरदार खाटीक, सचिन मोरे, सागर चोपडे, युवासेना शहरप्रमुख अनिकेत माने, भालचंद्र कोळी, रमेश माळवदे, सतीश परीट, निलेश चिंगळे, बारस जाधव, अवधूत माळी, प्रकाश जाधव, अमोल सलगर, महेश शिंदे, किशोर माने, महावीर कांबळे, संजय लोहार, सौरभ मोरे, प्रणव सोनवले, विनोद माने, राजू दर्वेश, तानाजी माने व शिवसैनिक, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, युवासैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
