हातकणंगलेतील वारणा पट्टयात डॉ. सुजित मिणचेकर यांना वाढता प्रतिसाद
शिरोली : परिवर्तन महाशक्ती आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी वारणा पट्ट्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. आमदारकीच्या दहा वर्षातील विकासकामे आणि त्यानंतरही सततचा लोकसंपर्क यामुळे डॉ. सुजित मिणचेकर यांच्या निलेवाडी , बिरदेव नगर, नवे पारगाव, जुने पारगाव गावातील पदयात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून दिवसेंदिवस त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
हलगीचा कडकडाटात आणि गगनभेदी घोषणा देत हातकणंगले मतदारसंघातील वारणा पट्ट्यातील अनेक गावात त्यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरु आहे. निलेवाडी, नवे पारगाव, जुने पारगावातून पदयात्रा काढून घरोघरी भेटी दिल्यानंतर पदयात्रेत डॉ. मिणचेकर यांनी मतदारांशी संवाद साधताना पुढील पाच वर्षात हातकणंगले विधानसभा मतदार संघामध्ये विकासकामांचा धडाका लावला जाईल. तसेच मतदारसंघामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणुन या परिसरातील तरुण सक्षम करणार आहे. तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिट्टी समोरचे बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.
पदयात्रेत संपतराव शिंदे, अनिल सुतार , उदय शिंदे, अनिल लोहार, मानसिंग मोहिते, नजीर बारगीर, प्रमोद बोरगे, अनिल जोशी, संतोष मोहिते, संजय कांबळे, बाळासाहेब सूर्यवंशी, भानुदास पाटील, प्रकाश गोंडे, अमोल मोहिते, विवेक नागावकर, विजय भोसले व शशिकांत मिणचेकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, शिवशक्ती व भीमशक्तीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते , मिणचेकर प्रेमीकार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
