November 2, 2025

शिवसेनेची हातकणंगलेची ऑफर नाकारली कोल्हापूरातून स्वतंत्र लढणारच : चेतन नरके

0
20240328_202757

कोल्हापूर/ प्रतिनिधी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केला होता. नुकताच मी त्यांना फोनवरून मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे. पण कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणातून मी माघार घेतलेली नाही. मी रिंगणात असणार आहे. पण कशा पद्धतीने असणार आहे, हे लवकरच सांगेन. असे डॉ.चेतन नरके यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी चेतन नरके म्हणाले हे माझं मोठं भाग्य आहे, की शिवसेनेने मला ही मोठी संधी दिली.  मी त्यांना माझी भूमिका नम्रपणे सांगितलेली आहे. गेल्या तीन पिढ्या नरके घराणे समाजाच्या कल्याणासाठी झटत आहे. आणि गेली अडीच वर्षे मी कोल्हापूर लोकसभेसाठी चांगल्या पद्धतीने काम करत असताना १२५५ गावापर्यंत गाव ते गाव संपर्क ठेवलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर आरोग्य, शिक्षण तसेच प्रत्येक तालुक्याचे विषय लक्षात घेऊन याबाबत काय करता येईल आणि चेंबर ऑफ कॉमर्स, गोशीमा, उद्यम नगर, कागल एमआयडीसी यामध्ये परकीय चलन कसे आणता येईल. बाहेरच्या कंपन्यांबरोबर करार कसे करता येतील. आयटी हब, पर्यटन याबाबत जिल्ह्याला पुढे कसे न्हेता येईल, यासाठी काम करत आहे. माझ्या कामाचा आवाका, माझे शिक्षण, गगनबावडा, पन्हाळा, करवीर मधील माझ्या मतांचा गठ्ठा, गोकुळच्या माध्यमातून नरके गटाचे काम बघून लोकसभेसाठी माझा विचार झाला होता. पण हातकणंगले लोकसभा उमेदवारीस मी नकार दिला आहे. कारण इतक्या कमी दिवसात प्रत्येक गावात मी पोहोचू शकत नाही. अडीच ते तीन लाखांचे माझे मतदान असल्याने त्यांनी मला तिकीट दिले होते. परंतु वेळ कमी असल्याने मी ते नाकारले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबतत्यांना विचारले असता, मी लवकरच निर्णय घेईन. तिसरा पर्याय मी होऊ शकतो. जनता हाच मोठा पक्ष आहे.मी कुठल्याही पक्षाचा नाही. पण कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणातून मी माघार घेतलेली नाही. मी रिंगणात असणार आहे. पण कशा पद्धतीने असणार आहे, हे लवकरच सांगेन. अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे. अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. असे सूचक वक्तव्य देखील डॉ. चेतन नरके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page