हेमलता माने काँग्रेस पर्यावरण विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष
कोल्हापूर : गांधीनगर येथील सौ. हेमलता बबन माने यांची कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) पर्यावरण विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख समीर वर्तक व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डाकरे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र माने त्यांना देण्यात आले. माने यांनी श्री महालक्ष्मी वुमेन्स फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणामध्ये योगदान दिले आहे. पर्यावरण संवर्धन याबरोबरच पक्षबांधणी व पक्षसंघटनेची जबाबदारीही माने यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
