November 1, 2025

पालकमंत्री मुश्रीफ यांनी केली महापालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी

0
high
कोल्हापूर : कसबा बावडा येथील एसटीपी प्रकल्प लोकार्पण सोहळ्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांची शहरातील निधी देऊनही रखडलेल्या विकास कामावरून चांगलीच खरडपट्टी केली. लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांना बदला.” अशा सुचना पालकमंत्र्यांनी देऊन मंजूर कामे ताबडतोब करण्याच्या सूचना केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील रखडलेल्या कामावरून नागरिकांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाच लक्ष्य केल्याने ते चांगलेच संतापले. कसबा बावडा येथील एसटीपी प्रकल्प लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त समोर आलेल्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

   शहरातील खराब झालेल्या खड्ड्यांवरून लोकांकडून विचारणा होत आहे. असे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनाच  कमिशन यायचं बाकी आहे म्हणून काम थांबलं आहे का  अशी थेट विचारणाही केली.

 यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांना भडकलेल्या अवेशातच कोल्हापुरातल्या विकास कामावरून मंत्री मुश्रीफ यांनी  व्यासपीठावर असलेल्या आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांची आमदार जयश्री जाधव यांच्यासमोर कानउघाडणी केली.
यावेळी  ते म्हणाले, “शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिक वैतागला आहे. खराब रस्त्यांमुळे पालकमंत्र्यांकडे लोक बोट दाखवत आहेत. जिल्ह्यात रखडलेल्या कामांवरून माध्यमातून टिका होत आहे. लोकांच्याकडून विचारणा होत आहेत. फंड मंजूर असताना रस्त्याची कामे पूर्ण का झाली नाहीत ? त्यामुळे आयुक्त मॅडम यांनी यामध्ये लक्ष घालून काम केलं पाहीजे. लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांना बदला.” अशा सूचना देताना  पालकमंत्र्यांनी अडसूळ हे ग्रामविकास विभागात असताना त्यांना मी नगरविकास विभागात आणल्याची आठवण करून दिली. आणि मंजूर कामे ताबडतोब करण्याच्या सक्त  सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page