राज्यपाल रमेश बैस यांचा कोल्हापूर दौरा रद्द
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आज संपन्न होत आहे दीक्षांत समारंभ राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते, प्रमुख पाहुणे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता. कार्यक्रमास काही तासच उरले असताना आता अचानक राज्यपाल रमेश बेस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे.
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा रद्द झाल्याने आता शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ डॉक्टर एस. एस. मंथा यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून
राज्यपाल महोदय यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा रद्द झाल्यामुळे
कंदलगाव येथे होणारा विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम व महाशिबिर जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु राहणार असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातील नेत्यांनी राज्यपाल बैस यांना कोल्हापूर दोऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. याबाबत पोलीस प्रशासनाने आंदोलकांची राज्यपाल यांचेशी भेट घालून देण्याची तजवीज केली होती. आता ही भेटही होऊ शकणार नाही.
