कोल्हापूरात राज्यपाल रमेश बैस घेणार मराठा आंदोलकांची भेट
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांनी उद्या सोमवारी विविध कार्यक्रमासाठी कोल्हापुरात येणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार केला होता. शासनाच्या गृह खात्याने याची गंभीर दखल घेतली. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी मराठा आंदोलन कर्त्याची भेट घेण्याचे मान्य केले. त्यामुळे मराठा आंदोलनकर्त्यांनी आपले काळे झेंडे दाखवण्याचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत या आंदोलनकर्त्यांचे नेते बाबा इंदुलकर यांनी हे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. आणि आंदोलनकर्त्यांना दसरा चौकात येण्याचे आवाहन केले. राज्यपाल यांची आंदोलनकर्त्यांशी कोल्हापूर विमानतळावर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भेट होण्याची शक्यता आहे.
