November 1, 2025

माजी आ डॉ. सुजित मिणचेकर आता निघाले शिंदेंच्या शिवसेनेत

0
GridArt_20241101_081920385

कोल्हापूर : सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असलेले हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यानी अखेर शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही सहकऱ्यां समवेत २७ फेब्रुवारी रोजी ते प्रवेश करणार आहेत.
माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी सुरवातीची १० वर्षे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत शिवसैनिक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना २००९ च्या निवडणूकीत वडगाव राखीव विधान सभा मतदार संघातून शिवसेनेतून उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले. २०१४ च्या निवडणूकीत दुसऱ्यांदा चांगल्या मताच्या फरकाने पुन्हा आमदार झाले. २०१९ च्या निवडणूकीत मात्र त्यांचा काँग्रेसच्या राजूबाबा आवळे यांनी निसटता पराभव केला.
त्यानंतरच्या ५ वर्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतच कार्यरत राहिले. सेना-भाजपचा काडीमोड, महाविकास आघाडची सत्ता, त्यानंतर एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिवसेनेची फूट, महायुतीची सत्ता,या राज्य पातळीवरील राजकिय घडमोडीत डॉ. सुजित मिणचेकर यांचा शिंदे गटात जाण्याचा ओढा होता. पण तालुक्यातील राजकिय परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच रहाण्याचा निर्णय घेतला. २०२५ च्या निवडणूकीत महाविकास आघाडीतील आघाडीधर्म आडवा आला आणि त्यांचे शिवसेनेतूनही तिकीट कापले गेले. त्यामुळे ऐन निवडणूकीत डॉ. मिणचेकर यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली पण त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जाताना आपली अमानत रकमही वाचवता आली नाही.
या पराभवानं डॉ. मिणचेकर यांचे राजकीय भवितव्यच अंधकारमय बनले आहे. त्यामुळे अस्वस्थपणे विचार करताना आता एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर त्यांच्यासाठी आशेचा किरण बनला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरला कोल्हापूर जिल्हयात प्रतिसाद मिळाला नव्हता. अशावेळी शिंदे शिवसेनेचे खा. धैर्यशील माने यांनी यासाठी डॉ. मिणचेकर यांचेवर जाळे टाकले. त्याच मार्गवर असलेले डॉ. मिणचेकर यांनी स्वःताहून या जाळ्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ते शिवसेना उबाठा पक्षात नाहीत त्यामुळे त्यांच्या जाण्याने ठाकरे सेनेला धक्का बसला अशी परिस्थिती नाही. आता
ते एकटेच जाणार का त्यांच्या सोबत आणखी काहीजण शिंदे गटात जाणार? आणि ते कोण असणार याबाबतही उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page