राज्यातील अपयशी सरकार बरखास्त करा : काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात गुंडाराज सुरु आहे. लोकप्रतिनिधी, पत्रकारांवरल प्राणघातक हल्ले केले जात आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये घुसून गोळीबार करत आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे त्यामुळे हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन केली.
या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे हे होते.
