एकाधिकारशाही रोखण्यासाठी देशात परिवर्तन आवश्यक : श्रीमंत शाहू महाराज
कोल्हापूर : देशातील लोकशाही धोक्यात आली असून एकाधिकारशाही आणणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडी म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून देशात परिवर्तन आणण्याची गरज आहे असे प्रतिपादन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केले ते कोल्हापुरात इंडिया आणि महाविकास आघाडीवतीने आयोजित वज्रमुठ प्रचार सभेत बोलत होते उद्या आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने येथील सैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात अनेक भ्रष्टाचाराचे एकमेकांवर आरोप केलेले आणि दोन्ही पक्षातून फुटून गेलेली मंडळी मंत्रिमंडळात एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांना लाज कशी वाटत नाही असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. तर कोल्हापूरची अस्मिता आणि स्वाभिमान म्हणून श्रीमंत छ. शाहू महाराजांना संसदेत पाठवण्याची जबाबदारी एकसंघपणे पार पाडू या असे आवाहन कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री सतेज पाटील यांनी केले.
यावेळी श्रीमंत शाहू महाराज म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात मोगलशाही, आदिलशाही काळामध्ये आपले स्वतंत्र राज्य स्थापन केलं नंतरच्या काळात परिवर्तन चुकीच्या दृष्टिकोनातून होत गेलं आणि समाज आपला विस्कळीत होत गेला आणि या विस्कळीत झालेल्या समाजास पुन्हा एकदा वळणावर आणण्यासाठी महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य फार मोलाचे ठरले. छत्रपती शाहू महाराजांचा विशेषतः समतेचे विचार जनतेच्या हितासाठी काम करण्याचे विचार आपण शिकलो आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज मी आपल्या समोर निवडणुकीसाठी उभा आहे. शाहू महाराजांचा समतेचा विचार संपूर्ण भारताला एवढा महत्वाचा ठरतंय ठरणार आहे आणि या विचारानेच हे भारत सरकार चालेल. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही म्हणून त्यावेळेस शाहू महाराजांनी शिक्षणावर जो भर दिला तो महत्त्वाचा ठरला त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या सारखी नवी पिढीनंतर तयार झाली. शाहू महाराजांनी माणगाव परिषदेत दलित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच तुमचे भविष्यातील नेते असतील असे सांगितले आणि तेच खरे ठरले.स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी लोकांनी लोकांच्यासाठी केलेले संविधान लोकांना अर्पण केले. या लोकशाहीमुळे आज आपण इथं या कार्यक्रमात येऊ शकलोय. लोकशाही नसती तर कदाचित या कार्यक्रमाला येताही आल नसतं. पण लोकशाही आज धोक्यात आली आहे हे खर आहे. कारण या लोकशाहीच्या माध्यमातून अलीकडे एकाधिकारशाही निर्माण होत चालली आहे. आणि या एकाधिकारशाहीचे कधीही हुकूमशाहीमध्ये त्याचा परिवर्तन होऊ शकते. म्हणून आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे. आपल्या स्वतःचे हक्क राखले पाहिजे. जनतेचे, स्त्रियांचे हक्क राखले पाहिजे. त्यांचे संरक्षण झालं पाहिजे. लोकशाही मजबूत करून भारताच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे.
कोल्हापूरचेही विकासाचे अनेक प्रश्न आहेत. विकासांतर्गत कामे अनेक होऊ शकतात. आपल्यामध्ये बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात आज आहे आणि ती जर कमी करायची असली तरी अनेक प्रकल्प चांगले झाले पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले रस्ते, एअरपोर्ट, रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे लक्ष दिले नाही तर आपल्याला कोण माफ नंतर करणार नाही. आयटी पार्कचे एक आवश्यकता आहे. अग्निवीरची पॉलिसी <span;>चुकीची आहे. <span;> या साठी परिवर्तन आवश्यक आहे. परिवर्तन घडवून आणण्याचा काम मात्र हे आपणा सर्वांचे आहे. परिवर्तन आपोआप घडत नसते एक घडवून आणण्याचे असते म्हणूनच आपलं बहुमोल मतं पडले पाहिजे.
आ.सतेज पटील म्हणाले सर्वच इंडिया आघाडीतील प्रमुख मंडळीनी या परिस्थितीमध्ये एक विचाराची लढाई या कोल्हापूरच्या मातीतून लढली गेली पाहिजे. आणि ती लढण्याचा सामर्थ्य कुणामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त शाहू महाराजांच्या मध्ये आहे. आदरणीय शाहू महाराजांनी निर्णय घेतला की या लढाईमध्ये आपण मागे राहायचं नाही. लीड फ्रॉम द फ्रंट या पद्धतीने या लढाईमध्ये सहभागी होण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. गेल्या दहा वर्षांमध्ये देशाची प्रगती झाली का? काहीच लोकांची प्रगती झाली हे देशातल्या जनतेला आता कळून चुकले आहे. राजर्षी शाहू महाराजांचा विचार हा घराघरांमध्ये पोचवायचं काम आपल्याला करावे लागेल. 50 वर्ष कोल्हापूर जिल्हा पुढं घेऊन जाण्याचे काम त्या काळामध्ये शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने केला राधानगरी धरण नसतं तर आमची काय अवस्था असते हे आम्ही विचार देखील या ठिकाणी करू शकत नाही. या उपकाराची परतफेड करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक अरबी समुद्रामध्ये भूमिपूजन होऊन आज आठ वर्ष झालं काय झालं त्या स्मारकाचं? त्याचे उत्तर भाजप देत नाही. गेल्या दहा वर्ष छत्रपती राजाराम महाराजांचे नाव एअरपोर्टला देण्याची मागणी करूनही नाव का दिले नाही. याचे उत्तर द्यावे भविष्यकाळात प्रत्येक तालुक्यामध्ये खासदारांचे स्वतंत्र ऑफिस असेल. असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी जे कोणत्याही पक्षात कधी नव्हते कोणताही राजकीय अभिनिवेश कधी दाखवला नाही. त्यांनी शाहू महाराजांचा विचार टिकवायचा असेल महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार आपण पुढे न्यायचा असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला आता पाऊल टाकलं पाहिजे म्हणून त्यांनी ही उमेदवारी स्वीकारली. केंद्र सरकारने मोदी आपल्या देशातल्या बँकांना मुक्तहस्ते लुटण्याची परवानगी दिलेली आहे. दोन्ही पक्षांतून फुटून गेलेल्याना मंत्रिमंडळात जाऊन बसायची संधी मिळालेली आहे प्रत्येकावर वेगळे आरोप आहेत तरीदेखील मांडीला मांडी लावून बसायला यातल्या कोणाला लाज वाटत नाही? ही भारतीय जनता पक्षाची आजची नीती आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणी उभारायचं कुणी कुठल्या पक्षात जाऊन उमेदवारी घ्यायची हे फडणवीस ठरवतात आणि आमचे दोघेही आणि हात जोडून तिथं जाऊन उभे राहतात. याचे आम्हाला फार वाईट वाटतं. ते आमच्याबरोबर सगळे असताना त्यांना आत्मसन्मान होता स्वाभिमान होता. ही निवडणूक कोल्हापूर जिल्ह्यातील आणि खास करून कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही तिकडे मशाल आहे इकडे हात आहे. या दोन्ही निवडणुकात आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याचे पुरोगामीत्व सिद्ध पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली करायचं आहे. जातीयवादी विचारसरणीला या कोल्हापूरने करवीरनगरीने कधीच थारा दिला नाही. आणि त्यामुळे यंदाची निवडणूक ही महाराष्ट्राला आणि देशाला दिशादर्शक करण्याचं काम तुम्ही हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कराल असं माझा विश्वास आहे.
मुश्रीफ यांच्या हेलिकॉप्टरने मतदार आणण्याच्या वक्तव्याचा त्यांनी पुन्हा समाचार घेतला. मतदार टू व्हीलरवर येईल, चार चाकीवर येईल. गडहिंग्लजचा मतदार कागलमध्ये मतदान नाही करणार आणि कागलचा मतदार कोल्हापुरात येऊन हेलिकॉप्टरने मतदान नाही करणार. पण किती पैसा या निवडणुकीत खर्च होणार आहे हे लक्षात येते. खोटी आश्वासन दिली जातील. तुमचं मागच्या चार-पाच वर्षातला जो अनुभव या सरकारबद्दल आहे तो सरकार बद्दलचा अनुभव विसरू नका
डॉ. भारत पाटणकर म्हणाले लढाई एका व्यक्तीविरुद्ध नव्हे प्रवृत्ती विरुद्ध आहे हे कार्यकर्त्यांनी जनतेला जाऊन सांगायला पाहिजे. आता परत उलट चक्र फिरवायला ते बसलेले आहेत ते राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी समतेसाठी संघर्ष केला. आता सगळी इतिहासाची चाकं उलटी फिरवण्याचा जे काम चालू आहे हे आम्ही होऊ देणार नाही
गडहिंग्लज माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी म्हणाल्या आपले ऐकून घेण्याचे दिवस काय उरणार नाहीत कदाचित ह्या निवडणुका शेवटच्या असतील. ही परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी आपल्या सर्वांच्या सन्मानासाठी आपण ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. खरोखर भ्रष्टाचार केला ते घाबरले आणि ज्यांनी काँग्रेस मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त देशाचे स्वप्न दाखवली त्यांनी आज सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतले. आज भाजप एवढा भ्रष्टाचारयुक्त भ्रष्टाचाराने बरबटलेला दुसरा पक्ष आज भारतात राहिलेला नाही. श्रीमंत शाहू छत्रपती एक संवेदनशील मनाचे निष्कलंक राजे आहेत. दुसऱ्याच्या सुखात आनंदी होताना राजांना बघितले. या राजाने खरंच आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या हृदयात घर केलेलं आहे.
नंदाताई बाबुळगावकर म्हणाल्या आजची परिस्थिती बघितली तर खरोखर मन व्यतीत झालं आणि विचार केला जर माझे वडील बाबासाहेब कुपेकर जिवंत असते तर त्यांनी छातीचा खोट करून पवार साहेबांच्या समोर उभे राहिले असते आणि या संघर्षात त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून काम केला असता आणि म्हणून आज एक फुल ना फुलाची पाकळी या संघर्षात पवार साहेबांची साथ देण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत. मुश्रीफ यांच्या बद्दल त्या म्हणाल्या आज खरोखर एवढ्या छोट्या मोठ्या कामासाठी देवाला बोलवायची गरज नाही. ही कोल्हापूरची जनता महाराजांना निवडून आणायला समर्थ आहे. आज या परिस्थितीत जे काही घडलं ते जनता उघड्या डोळ्यांना गेले वर्ष, दीड वर्ष बघते आहे. त्यांच्या मनात राग आहे. या सर्व गोष्टींचा राग व्यक्त करायची संधी मिळालेली त्यामुळे अतिशय विचारपूर्वक आपण मतदान करणे गरजेचे आहे .
शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी मंडलिक माने यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले घाणेरडं राजकारण गलिच्छ राजकारण सुरू झालं. ही सभा आपण बघतोयआणि त्यांच्या सभेच्या खुर्च्या काढाव्या लागतात. ते सभेसाठी भरपूर पैसे खर्च करतात. गाड्या पाठवतात खाऊ देतात हे देतात सगळे देतात परंतु लोकं पण येत नाहीत. आणि हे बोलायला उभारल्यानंतर लोक पळून जातात. हिंदू देवतांचा तुम्ही अवमान करू नका असा इशारा मुश्रीफ यांना त्यांनी दिला.
संभाजीराजे म्हणाले दहा ते बारा दिवस मी कोल्हापूर कोल्हापूर शहरात थांबलो नाही. गाव टू गाव अडीचशे गाव मी पूर्ण केलेले आणि 900 पैकी सातशे गाव पूर्ण केल्याशिवाय गप बसणार नाही. ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या गावात वेगवेगळे गट भेटायचे. मला आपल्या महाविकास आघाडीतलेच नव्हे तर विरोधी पक्षातले सुद्धा अनेक गट येऊन मला भेटायचे. नेमकं काय चाललंय आणि हे नंतर मला समजले. की ही इलेक्शन ही निवडणूक ही पक्षाच्या पलीकडे गेलेली निवडणूक आहे. दिल्लीत वातावरण पाहिले तर लोकशाहीच्या बद्दल शंका निर्माण व्हायला लागलेली आहे. अशावेळी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा प्रामुख्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार आणि पुरोगामी विचार हा दिल्लीत गेल्याशिवाय या सगळ्या निर्माण झालेली आहे ही दुरुस्त होणार नाही. जे इकडे तिकडे उड्या मारतात, समतेचा विचार बाजूला ठेवतात शाहू महाराजांच्या नगरीत हे चालेल का? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी आ. पी एन पाटील, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, राजुबाबा आवळे, विजय देवणे,अनिल घाटगे, कॉ. दिलीप पोवार, संजयबाबा घाटगे, आप्पी पाटील, यांचेसह महाविकास आघाडीतील घटकपक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
